ISRO Recruitment Test Scam: इस्त्रो मध्ये नोकरीच्या संधीसाठी परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी 2 जण अटकेत
हरियाणातून एका निनावी कॉलद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे या दोघांना पकडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ISRO कडून Vikram Sarabhai Space Centre मध्ये टेक्निकल स्टाफ साठी घेतल्या जाणार्या परीक्षेमध्ये चिटींग केल्याच्या आरोपाखाली 2 उमेदवारांना अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. हे दोन उमेदवार दोन वेगवेगळ्या सेंटर वरून पकडण्यात आले आहेत. परीक्षेमध्ये चूकीच्या पद्धतीचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान हे दोघेही प्रत्यक्ष उमेदवार नव्हतेच भलत्याच विद्यार्थ्यांच्या जागी डमी उमेदवार म्हणून बसून ते परीक्षा देत असल्याचेही समोर आले आहे.
रविवार 20 ऑगस्टच्या रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. या 2 व्यतिरिक्त चार अन्य उत्तरभारतीय मुलं देखील पकडण्यात आली आहेत. दरम्यान त्यांनी परीक्षा दिली आहे की नाही? याचा तपास अजूनही सुरू आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कलम 406,420 सोबतच Information Technology Act अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांची अटक ही खोटा उमेदवार म्हणून परीक्षा देत असल्याने करण्यात आली आहे.
पोलिसांकडून VSSC ला या परीक्षेमधील गैरप्रकरावरून दाखल झालेल्या गुन्ह्याची आणि अटकेची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही परीक्षा रद्द करायची की नाही हा निर्णय VSSC वर सोडण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये काही कोचिंग सेंटर्सचा समावेश होता का? याची चाचपणी सध्या सुरू आहे.
अटक केलेल्या विद्यार्थ्यांनी मोबाईल फोन कॅमेरा वापरत प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले आणि त्याची उत्तरं पलिकडून त्यांना ब्लूटूथ डिव्हाईस वर मिळत होती.
हरियाणातून एका निनावी कॉलद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे या दोघांना पकडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.