Israel-Hamas Conflict दरम्यान Air India ने Tel Aviv कडे ये-जा करणारी विमानं 18 ऑक्टोबर पर्यंत केली रद्द

दिल्ली मधून इस्त्राईलला यापूर्वी एअर इंडिया 5 विमानांची दर आठवड्याला सेवा देत होते. ती आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहेत.

Air India (PC - Twitter)

Air India कडून Tel Aviv कडे जाणारी आणि येणारी विमानं 18 ऑक्टोबर पर्यंत रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. सध्या इस्त्राईल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी आठवड्याला 5 विमानं Tel Aviv कडे जात होती. पण युद्धामुळे ही सेवा स्थागित करण्यात आली आहे. पूर्वी 14 ऑक्टोबर पर्यंत ही सेवा खंडीत करण्यात आली होती. त्यामध्ये आता वाढ करून 18 ऑक्टोबर पर्यंत ही विमानसेवा खंडीत राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एअरलाईनच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवारी म्हणजे आज 14 ऑक्टोबर दिवशी ही विमानसेवा 18 ऑक्टोबर पर्यंत खंडीत राहील याची माहिती देण्यात आली आहे. मात्र सध्या इस्त्राईल मध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी विशेष मोहिम सुरू आहे. त्यामध्ये जशी गरज असेल तशी खास चार्टर फ्लाईट्स इस्त्राईल मध्ये नेऊन भारतीयांना सुखरूप मायदेशी आणले जात आहे.

दिल्ली मधून इस्त्राईलला यापूर्वी एअर इंडिया 5 विमानांची दर आठवड्याला सेवा देत होते. दर सोमवार, मंगळवार, गुरूवार, शनिवार, रविवार ही विमानसेवा होती. सध्या इस्त्राईल मध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी केंद्र सरकार कडून ऑपरेशन अजय राबवले जात आहे. त्याच्या मदतीने भारतीयांना सुखरूप देशात आणले जात आहे. आतापर्यंत 2 विमानं भारतामध्ये परत आली आहेत.

हमासकडून युद्ध सुरू करण्यात आल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्राईल कडूनही मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू झाले आहेत. त्यांच्या अनेक बेसकॅम्पवर इस्त्राईलही हल्ले करत ते नष्ट केले आहेत. Israel-Hamas War: एका हातात इस्रायलमधून अपहरण केलेली मुलं, दुसऱ्या हातात रायफल; हमासच्या दहशतवाद्यांनी जारी केला व्हिडिओ, Watch .

इस्त्रायल-हमास युद्धाचा आज आठवा दिवस आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने अचानक हल्ला सुरू केल्यापासून दोन्ही बाजूंनी किमान 3,200 जण मरण पावले आहेत. इस्रायलच्या सैन्याने आपल्या नागरिकांना उत्तरेकडील गाझा पट्टी दक्षिणेकडे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत आणि इस्रायल जमिनीवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now