IPL Auction 2025 Live

Bhakti Charu Swami Passes Away: ISKCON चे प्रमुख गुरु ‘भक्ति चारू स्वामी’ यांनी अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास; कोरोना विषाणूमुळे झाले निधन

त्यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली होती व त्यांच्यावर फ्लोरिडामध्ये उपचार सुरू होते. भक्ति चारू महाराजांचा जन्म 17 सप्टेंबर 1945 रोजी कोलकाता येथे झाला होता.

Bhakti Charu Swami (संग्रहित संपादित प्रतिमा)

इस्कॉन (ISKCON) चे प्रमुख गुरु भक्ति चारू महाराज (Bhakti Charu Swami) यांचे आज अमेरिकेत (US) निधन झाले. त्यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली होती व त्यांच्यावर फ्लोरिडामध्ये उपचार सुरू होते. भक्ति चारू महाराजांचा जन्म 17 सप्टेंबर 1945 रोजी कोलकाता येथे झाला होता. भक्ती चारू महाराज इस्कॉनच्या सर्वोच्च संचालन समितीचे आयुक्तही होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती, त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शनिवारी मल्टी आर्गन फेल्युअरनंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मध्य प्रदेशातील उज्जैन येथील इस्कॉन मंदिरात ते नेहमी येत असत. भक्ति चारू महाराजांच्या निधनाने इस्कॉनची समस्त भक्त मंडळी दुःख सागरात बुडाली आहेत.

स्वामीजी 3 जून रोजी उज्जैनहून अमेरिकेला गेले होते.18 जून रोजी त्यांची कोरोना विषाणू चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान, 29 जून रोजी त्यांना हार्टअटॅकही आला होता. तसेच त्यांना प्लाझ्मा थेरपी देखील देण्यात आली होती, परंतु तरीही त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली नाही. इस्कॉनचे पीआर राघव पंडितदास यांच्या म्हणण्यानुसार, स्वामीजींच्या आरोग्यासाठी इस्कॉन मंदिरात धार्मिक विधी व प्रार्थना केल्या जात होत्या. सर्व संत, भक्त आणि पुजारी उज्जैन शाखेतही त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करीत होते. (हेही वाचा: Donald Trump Jr यांची गर्लफ्रेंड Kimberly Guilfoyle ला कोरोना विषाणूची लागण; सध्या दोघेही आयसोलेशनमध्ये)

दरम्यान, स्वामीजी दोनदा इस्कॉनच्या गव्हर्निंग बॉडी कमिशनचे अध्यक्ष होते. भक्तिचरु स्वामीजी इस्कॉनचे संस्थापक, आचार्य कृष्णकृपमूर्ती, अशा भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद जी यांचे प्रिय शिष्य होते. त्यांना श्रीला प्रभुपादांची सेवा करण्याची संधीही मिळाली तसेच त्यांनी 'अभय चरण' या नावाने टीव्हीवरील मालिकेची निर्मिती केली होती.  कृष्ण भक्तीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी उज्जैनमधील इस्कॉन मंदिर समर्पित केले होते. त्यांनी कृष्णाभक्तीला चालना देण्यासाठी जगभर प्रवास केला आणि ते युरोप, आफ्रिका आणि इतर देशांचे जीव्हीसी देखील होते. भक्तिचारू महाराजांच्या निधनाच्या बातमीनंतर सोशल मिडियावरही अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.