Monk Amogh Lila Das यांच्यावर ISKCON कडून महिन्याभराची बंदी; Swami Vivekananda, Ramakrishna Paramhans यांच्याबाबतचं वक्तव्य भोवलं

Monk Amogh Lila Das हे महिनाभर सोशल मीडीयापासूनही दूर राहणार असल्याची माहिती इस्कॉनने दिली आहे.

Monk Amogh Lila Das | Insta

The International Society for Krishna Consciousness अर्थात इस्कॉन कडून Monk Amogh Lila Das यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान Amogh Lila Das यांनी स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 43 वर्षीय अमोघ लीला दास हे प्रेरक वक्ते आणि द्वारका येथील इस्कॉनचे उपाध्यक्ष आहेत. सोशल मीडीयावर अमोघ लिला दास यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

अमोघ यांनी आपल्या चूकीची कबुली दिल्याचं इस्कॉनने प्रेस रिलीज जारी करत म्हटलं आहे. या चूकीचं प्रायश्चित्त म्हणून ते महिनाभर सोशल मीडीयापासून दूर राहणार आहेत असे म्हणाले आहेत. अमोल लिला दास हे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बोलण्याच्या खास शैलीमुळे ते अनेकांच्या गळ्यातील ताईत आहेत.

अमोघ हे इंजिनियर होते. अमेरिका स्थित कंपनीमध्ये त्यांनी काम केले आहे पण अध्यात्माच्या शोधात त्यांनी आपलं जीवन कृष्णभक्तीत दिलं आहे. वयाच्या 28 व्या वर्षापासून ते इस्कॉन सोबत जोडले गेले आहेत. नक्की वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इस्कॉन मंदिरात 800 किलो भगवत गीतेचे उद्घाटन .

नेमका वाद काय?

अमोघ लिला दास यांनी स्वामी विवेकानंदांच्या माशांच्या सेवनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ते म्हणाले की, सद्गुणी मनुष्य प्राण्याला इजा पोहोचवणारी कोणतीही गोष्ट कधीही खाणार नाही. “सद्गुणी मनुष्य कधी मासे खाईल का? माशालाही वेदना होतात ना? मग पुण्यवान माणूस मासे खाईल का?” अमोघ लिला दास यांनी जनसमुदायाला संबोधित करताना सांगितले. त्यांनी स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्यावरही टीका केली आहे.