हॉटेलमध्ये राहणे खरच सुरक्षित? बंद खोलीतील गर्लफ्रेंडसोबतचा प्रायव्हेट व्हिडीओ Porn Site वर, तरुणाने दाखल केली तक्रार

परंतु ते व्हिडिओ इतर काही लोकांनी रेकॉर्ड केले आहेत की त्या व्यक्तीने किंवा त्याच्या मैत्रिणीने शूट केले आहेत याचा निष्कर्ष काढणे बाकी आहे.

प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credit: File Photo)

तुमच्या जोडीदारासोबत बेडरूममध्ये व्यतीत केलेले क्षण हे खूप पर्सनल असतात. अनेकदा जोडप्यांना प्रायव्हसी मिळत नाही, त्यामुळे त्यांना हॉटेल रूमचा (Hotel Room) पर्याय निवडावा लागतो. परंतु हॉटेलमधील बंद खोलीतील रोमान्सनी भरलेल्या क्षणांचा व्हिडिओ पॉर्न साइटवर (Porn Site) दिसला तर काय होईल? कल्पनाही करवत नाही ना? आयटी सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये एका मुलासोबत अशीच घटना घडली आहे. हा तरुण बीपीओ कर्मचारी असून, त्याला त्याचा व्हिडीओ पॉर्न साइटवर दिसला. त्यानंतर त्याने कर्नाटक सायबर, इकॉनॉमिक अँड नार्कोटिक्स क्राइम (CEN) पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदवली.

या तरुणाचा त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा खाजगी व्हिडिओ बेंगळुरूमधील विविध पॉर्न साइटवर अपलोड करण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. तक्रारदार आणि त्याची मैत्रीण काही काळ बंगळुरू येथील एका हॉटेलमध्ये राहिले होते. त्यावेळी काही लोकांनी त्यांचे ‘खाजगी क्षण’ रेकॉर्ड केले आणि विविध पॉर्न साइट्सवर ते व्हिडिओ अपलोड केले, असे या तरुणाचे म्हणणे आहे. त्यातील एका पॉर्न साइटवर गेल्यानंतर या तरुणाला स्वतःचा व्हिडिओ सापडला. त्यानंतर त्याने त्याबाबत अधिक शोध घेतला तेव्हा त्याचे व्हिडिओ इतर पॉर्न साइटवरही सापडले.

अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये तक्रारदार आणि त्याच्या मैत्रिणीचे चेहरे दिसत नाहीत. परंतु फिर्यादीने शरीरावरील जन्मचिन्ह पाहून त्याची ओळख पटवली आणि तक्रार दाखल केली होती. मात्र, हा व्हिडीओ गुप्त कॅमेऱ्याने शूट करण्यात आला नसल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपास जसजसा पुढे जाईल तसतसे सत्य बाहेर येईल. (हेही वाचा: Bihar: नातवाच्या वाढदिवसादिवशी अमिताभ बच्चनचा अभिनय करणे पडले महागात; आजोबांना अटक, जाणून घ्या सविस्तर)

माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 (ए) अन्वये गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी केली. परंतु ते व्हिडिओ इतर काही लोकांनी रेकॉर्ड केले आहेत की त्या व्यक्तीने किंवा त्याच्या मैत्रिणीने शूट केले आहेत याचा निष्कर्ष काढणे बाकी आहे. परंतु यावरून हॉटेलमध्ये राहणे हे खरच सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.