IRCTC ने लाँच केले iPay पेमेंट गेटवे, सेकंदात बुकिंग होणार Online Ticket, वाचा सविस्तर
या सेवेचा वापर तुम्हाला IRCTC ची वेबसाइट आणि Rail Connect अॅप द्वारे करता येईल.
भारतीय रेल्वेने (Indian Railway) प्रवाशांना ऑनलाईन पद्धतीने तिकिट बुकिंग करणे अधिकाधिक सुलभ व्हावे यासाठी ऑनलाईन यंत्रणेत अनेक बदल केले. प्रवाशांचा तिकिटाच्या रांगेत तासनतास उभा राहण्याचा त्रास वाचावा यासाठी आपली ऑनलाईन तिकिट बुकिंग सेवा अद्ययावत केली. त्यातच आता IRCTC ने आपले नवे iPay पेमेंट गेटवे (iPay Payment Gateway) लाँच केले आहे. याच्या माध्यमातून आता काही सेकंदातच ऑनलाईन तिकिट बुक (Online Ticket Booking) करता येणार आहे. या सेवेचा वापर तुम्हाला IRCTC ची वेबसाइट आणि Rail Connect अॅप द्वारे करता येईल.
IRCTC ने आपल्या मागील महिन्यात आपल्या वेबसाइट आणि Rail Connect मोबाईल अॅप अपग्रेड केले होते. यात बरेच फिचर्स जोडण्यात आले होते. त्या फिचर्सनुसार, आता सुरु केलेल्या पेमेंट गेटवे iPay द्वारे काही सेकंदात तुम्ही तुमचे ऑनलाईन रेल्वे तिकिट बुक करु शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथून तिकिट Cancel केल्यानंतर त्वरित युजरच्या अकाउंटमध्ये रिफंड दिले जाईल.हेदेखील वाचा- IRCTC New Website: आयआरसीटीसी वेबसाईट द्वारा Train Booking सुपरफास्ट; काही मिनिटांत होणार तुमचे काम; आज लॉन्चिंग
IRCTC iPay चा वापर कसा कराल?
1. सर्वात आधी युजरला आपली पेमेंट बद्दलची माहिती तिथे द्यावी लागेल. यात तुम्हाला डेबिट कार्ड वा UPI चा सुद्धा वापर करु शकता.
2. अकाउंट लिंक केल्यानंतर युजरला वेबसाइटवर वा अॅपवर परवानगी घ्यावी लागते.
3. पेमेंट केल्यानंतर एकदा Save झाल्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही IRCTC वरुन तिकिट बुकिंग कराल, तेव्हा तुम्हाला पुन्हा पुन्हा सर्व अकाउंट डिटेल्स पुन्हा पुन्हा टाकण्याची गरज पडणार नाही.
4. यावेळी तुम्ही iPay चा वापर करुन काही सेकंदात रेल्वे तिकिट बुकिंग करु शकता.
यामुळे वेळेची बचत होईल आणि तुम्हाला तुमच्या सोयीनुसार, हवे त्या दिवसाचे तिकिट बुकिंग करता येईल. या iPay सेवेचा सर्वात मोठा फायदा हा होईल की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हवं तेव्हा तिकिट बुकिंग करता येईल. तसेच यात तुम्हाला Confirm तिकिट मिळण्याचे चान्सेस जास्त आहे कारण ऑनलाईन तिकिट बुकिंग करताना पेमेंट डिटेल्स टाकण्यासाठी लागणारा वेळ वाचेल.