IRCTC: कन्फर्म तिकिट न मिळाल्यास Vikalp Scheme चा वापर करा, जाणून घ्या नियम आणि अटी

तर प्रत्येक दिवशी हजारे रेल्वेची सोय करण्यात आल्याने त्याच्यामाध्यमतून लाखो प्रवाशी प्रवास करतात. मात्र काही वेळेस रेल्वेने लांब पल्ल्याच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी कन्फर्म तिकिट मिळणे थोडे मुश्किलच असते.

Indian Railway (Photo Credits-PTI)

भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठे रेल्वेचे जाळे असल्याचे म्हटले जाते. तर प्रत्येक दिवशी हजारे रेल्वेची सोय करण्यात आल्याने त्याच्यामाध्यमतून लाखो प्रवाशी प्रवास करतात. मात्र काही वेळेस रेल्वेने लांब पल्ल्याच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी कन्फर्म तिकिट मिळणे थोडे मुश्किलच असते. त्यावेळी प्रवासी वेटिंग लिस्ट मधील तिकिट खरेदी करणे योग्य मानतात. परंतु वेटिंग लिस्ट मधील तिकिट असणे ही सुद्धा एक समस्या असून प्रवाशांच्या सोईसाई रेल्वेने विक्लप स्किम (Vikalp Scheme) सुरु केली आहे. या स्किमच्या माध्यमातून आयरसीटीसीची अधिकृत वेबसाइट www.irctc.co.in च्या माध्यमातून तिकिट खरेदी करता येणार आहे.

प्रवाशांना कन्फर्म तिकिट मिळण्यासाठी आणि त्याचा फायदा होण्यासाठी एटीएएस योजना बनवण्यात आली आहे. ही योजना रेल्वेच्या सर्व श्रेणीमधील मेल/एक्सप्रेस रेल्वेगाड्यांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वेटिंग लिस्टवर असलेल्या प्रवाशांना अन्य रेल्वेचा पर्याय उपलब्ध करुन दिला जातो. मात्र दुसऱ्या रेल्वेचा पर्याय जरी दिला असला तरीही प्रवाशाला कन्फर्म तिकिट मिळेल असे नाही. तर जाणून घ्या नियम आणि अटी.