IPL Betting: गोव्यात आयपीएल च्या सामान्यांवर सट्टेबाजी करणाऱ्या 5 जणांना कलंगुटे पोलिसांकडून अटक, 25 हजारांहून अधिक रोकड केली जप्त
या प्रकरणी पाच जणांना कलंगुटे पोलिसांनी ताब्यात घेतले असून 25 हजारांहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे.
IPL Betting: सध्या देशात कोरोनाची परिस्थिती कायम असली तरीही आयपीएलचे वारे वाहत आहेत. यंदा आयपीएलचे सामने दुबईत खेळवले जात आहेत. मात्र सामान्यांसाठी लोकांना स्टेडिअममध्ये प्रवेश नाकारला गेला आहे. त्यामुळे सर्वजण ऑनलाईन पद्धतीने किंवा टीव्ही चॅनलवर आयपीएलचे सामने पाहताना दिसून येत आहे. मात्र आयपीएलच्या सामन्यांवर करण्यात येणारी सट्टेबाजी कोरोनाच्या काळात काही थांबलेली नाही ती चालूच आहे. याच पार्श्वभुमीवर गोव्यात (Goa) आयपीएलच्या सामान्यांसाठी सट्टेबाजी करणाऱ्या एका टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच जणांना कलंगुटे पोलिसांनी ताब्यात घेतले असून 25 हजारांहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांकडून शनिवारी रात्री बागा आणि कलंगुटे येथून पाच जणांना सट्टेबाजी करताना अटक केली आहे. यांच्याकडून 25,440 रुपयांची रोकड, 15 मोबाईल आणि 3 लॅपटॉप ज्यांची किंमत 2.5 लाख रुपये आहे ते जप्त केले आहेत. या आरोपींच्या विरोधात कलंगुटे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आयपीएलवर सट्टेबाजी करण्यासंदर्भातील एकाच महिन्यातील ही तिसरी घटना उघडकीस आली आहे.(IPL 2020 Points Table Updated: CSKविरुद्ध विजयानंतर RCB चौथ्या स्थानावर, कोलकाता नाईट रायडर्स तिसरे; पाहा कोण-कोणत्या स्थानावर)
अटक करण्यात आलेले तीन आरोपी हे इंदौर, मध्य प्रदेश आणि एकजण हा मुंबईतील आणि आणखी एक नेपाळ येथील असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याआधी सुद्धा ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीला आयपीएलवर सट्टेबाजी करणाऱ्या पाच जणांना गोव्यातून अटक करण्यात आली होती. तेव्हासुद्धा कलंगुटे पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला गेला होता.