IPL Auction 2025 Live

Internet Ban in Manipur Extended: मणिपूरमध्ये इंटरनेटवरील बंदीत वाढ, समाजविघातक पोस्ट रोखण्यासाठी सरकारचा निर्णय

सप्टेंबर महिन्यात 143 दिवसांनी ही बंदी उठवण्यात आली होती. परंतु, 26 सप्टेंबरला पुन्हा मोबाइल इंटरनेट डेटा सेवा खंडित करण्यात आली.

internet | (Photo credit: archived, edited, representative image)

गेल्या सहा महिन्यांपासून मणिपूर राज्यात अशांतता असून हिंसाचाराच्या घटनेमुळे अनेकांनी आपले घर आणि जीव हा गमावला आहे. 3 मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यानंतर संपूर्ण राज्यात मोबाईल इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती. 23 सप्टेंबर रोजी ही बंदी उठवण्यात आली होती.  परंतू यानंतर दोन तरुणांच्या मृतदेहांच्या छायाचित्रांनंतर विद्यार्थ्यांची सुरक्षा दलांशी झटापट झाली. परिणाीम 26 सप्टेंबर रोजी इंटरनेटवरील बंदी पुन्हा लागू केली आहे.  समाजकंटकांकडून व्हायरल होणारे मेसेज, फोटो आणि व्हिडीओ रोखण्यासाठी मणिपूरच्या गृहविभागाने 5 नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंदी वाढवली आहे.  (हेही वाचा - Delhi Metro Urination Video: धावत्या मेट्रोत प्रवाशाकडून मूत्रविसर्जन; घटना कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप)

मणिपूर हिंसाचाराच्या घटना वाढत गेल्याने सरकारने इंटरनेट बंदी आणली होती. सप्टेंबर महिन्यात 143 दिवसांनी ही बंदी उठवण्यात आली होती. परंतु, 26 सप्टेंबरला पुन्हा मोबाइल इंटरनेट डेटा सेवा खंडित करण्यात आली.  येत्या काही दिवसांत ही बंदी मागे घेतली जाईल, असंही आश्वासन मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंग यांनी दिले होते.  मणिपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचाप्रकरणी राज्यातील तरुण, विद्यार्थ्यांनी संयमाची भूमिका घ्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री सिंग यांनी एका सरकारी कार्यक्रमात संबोधित करताना केली आहे.

काही समाजकंटक सोशल मीडियाचा वापर करून द्वेषयुक्त भाषण, व्हिडीओ आणि फोटो प्रसारित करत आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी इंटरनेट बंदीचे आदेश देण्यात आले आहेत.