नव्या वर्षात फिरायला जायचा प्लॅनचा विचार,अवघ्या 899 रुपयांत विमानाने प्रवास करा
मात्र जर तुम्ही नव्या वर्षात फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. तर विमान कंपनी इंडिगो त्यांच्या ग्राहकांना देशाअंतर्गत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असलेल्यांना फक्त 899 रुपयात तिकिट विक्री करत आहे.
2019 चे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र जर तुम्ही नव्या वर्षात फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. तर विमान कंपनी इंडिगो त्यांच्या ग्राहकांना देशाअंतर्गत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असलेल्यांना फक्त 899 रुपयात तिकिट विक्री करत आहे. हा सेल तीन दिवसांचा असून 26 डिसेंबरला रात्री 11.59 वाजल्यापासून सुरु होणार आहे. इंडिगोच्या अधिकृत वेबसाईटवरुन किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून 26 डिसेंबर पर्यंत तिकिट बुकिंग करु शकता. या ऑफर अंतर्गत 15 जानेवारी 2020 ते 15 एप्रिल 2020 पर्यंत विमानाने प्रवास करु शकता.
इंडिगोच्या अधिकृत वेबसाईट्सवर दिलेल्या माहितीनुसार, देशाअंतर्गत फिरायला जायचे असल्यास तिकिटाची विक्री 899 रुपयांपासून सुरु आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मार्गावरुन जाण्यासाठी तिकिटाची किंमत 2999 रुपयांपासून सुरु आहे. जर तुम्ही मोबाईल अॅप किंवा वेबासाईटच्या माध्यमातून तिकिट बुकिंग करत असल्यास तुम्हाला कन्विनियंन्स चार्ज द्यावा लागणार नाही आहे.
कंपनीच्या मते दिल्ली ते अहमदाबाद पर्यंतची विमान तिकिट 1999 रुपये, दिल्ली ते अमृतसर 2099 रुपये आहे. तसेच तु्म्हाला दिल्ली शिवाय अन्य ठिकाणी देशाअंतर्गत प्रवास करयाचा असल्यास त्याबाबत अधिक माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. कंपनीची ही ऑफर मर्यादित कालावधी पूर्तीच सुरु राहणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच 31st डिसेंबरसाठी मोजून काही दिवस उरले आहेत. इतका कमी वेळ असताना देखील तुम्ही न्यू इयर सेलिब्रेशनसाठी काहीच प्लॅन बनवले नसतील तरीही अजिबात अपसेट होऊ नका. कारण कमी खर्चात तुम्ही गोकर्ण, हंपी, कोडाईकॅनल, जयपूर, पॉंडिचेरी या ठिकाणी जाऊ शकता.