Economic Survey 2021-22: अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी लोकसभेत मांडला आर्थिक सर्वेक्षण अहवाल; पहा महत्त्वाचे अपडेट्स!

यामध्ये पहिलं सत्र आजपासून सुरू झालं आहे.

Nirmala Sitharaman | (Photo Credits: Facebook)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey) जाहीर केला आहे. यामध्ये 2021-22 चा जीडीपी (GDP) 9.2% वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान चालू आर्थिक वर्षासाठी 9.2 टक्के जीडीपीचा अंदाज व्यक्त केला असून पुढील आर्थिक वर्षात तो 8 ते 8.5 टक्के राहील, असा अंदाज आहे.

सध्याच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्र 3.9% वाढेल, असा अंदाज व्यक्त आहे. त्याशिवाय औद्योगिक क्षेत्राचा 11.8 टक्के वृद्धीदर राहील,असा अंदाज आहे. सेवा क्षेत्राचा 8.2% दराने विकास होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे देखील नक्की वाचा: Budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट कव्हरेज कुठे, कधी आणि कसे पहावे? येथे पहा तारीख आणि वेळेसह संपूर्ण माहिती .

ANI Tweet

सर्वेक्षणानुसार महागाईचा दर आटोक्यात राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सर्वेक्षणात म्हटले आहे की, मोठ्या प्रमाणात लसीकरण, सुधारित पुरवठा, नियम सुलभ करणे, निर्यातीतील मजबूत वाढ आणि खर्च वाढवण्यासाठी वित्तीय जागा यामुळे अर्थव्यवस्थेला पाठिंबा मिळत आहे. जरी कोविड अर्थव्यवस्थेला आणखी अडथळा आणत नाही यावर सर्व अंदाज अवलंबून असणार आहेत. इथे वाचा अहवाल सविस्तर. 

यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर देशाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रामध्ये होणार आहे. यामध्ये पहिलं सत्र आजपासून सुरू झालं आहे. उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापूर्वी आजच्या आर्थिक सर्वेक्षणामधून अर्थव्यवस्थेबद्दल अंदाज व्यक्त करण्यात येतो. सध्या 11 फेब्रुवारी पर्यंत चालणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहांचे कामकाज पाच तास चालणार आहे. राज्यसभेचे कामकाज सकाळी 9 ते दुपारी 2 आणि लोकसभेचे कामकाज दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालणार आहे.