भारतातील पहिली COVID-19 Case दीड वर्षांनी पुन्हा कोरोनाच्या विळख्यात

3 आठवड्यांच्या उपचारानंतर तिने आजारावर मात केली होती आता पुन्हा कोरोनाबाधित झाली आहे.

Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

केरळ (Kerala)  मधील महिला मेडिकल विद्यार्थी जी भारतातील पहिली कोविड 19 रूग्ण होती तिचा पुन्हा एकदा कोविड 19 (COVID-19) चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज (13 जुलै) आरोग्य मंत्रालयाने त्याची माहिती दिली आहे. PTI ला माहिती देताना Thrissur DMO Dr K J Reena यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान ती asymptomatic आहे. तिचा RT-PCR पॉझिटीव्ह आला असून antigen रिपोर्ट निगेटीव्ह आहे.

2020 च्या 30 जानेवारीला ही तिसर्‍या वर्षीची मेडिकल स्टुडंट वुहान युनिव्हर्सिटी मधून भारतात सेमिस्टर हॉलिडे साठी परतल्यानंतर तिची कोरोना चाचणी करताच ती पॉझिटीव्ह आली होती. भारतात कोरोनाचं निदान होणारी ही पहिली व्यक्ती होती. Thrissur Medical College Hospital मध्ये तिच्यावर 3 आठवडे उपचार झाल्यानंतर तिचा कोवीड 19 चा रिपोर्ट दुसर्‍यांदा निगेटीव्ह आला होता. 20 फेब्रुवारी 2020 ला डिस्चार्ज देण्यात आला होता. आता ही मेडिकल स्टुडंट नवी दिल्लीला पुन्हा शिक्षणासाठी जात असताना तिची त्यापूर्वी चाचणी करण्यात आली आणि यामध्ये तिचा कोविड19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. सध्या ती घरीच असून ठीक असल्याचेही डॉक्टरांचे मत आहे.

PTI Tweet

भारतामध्ये आता कोविड 19 उपचारांसाठी पूर्वीच्या तुलनेत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसेच देशात आता लसीकरणाचा वेग सुधारला आहे. 18 वर्षांवरील सार्‍यांना सध्या कोविड 19 ची लस सरकार कडून मोफत दिली जात आहे. यामध्ये स्तनदा माता आणि गरोदर महिलांनाही लस दिली जात आहे.

कोरोनाची देशातील दुसरी लाट देखील आता आटोक्यात आल्याचं चित्र आहे. आजच देशात मागील 118 दिवसांमधील निच्चांकी कोरोनारूग्णांची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासांत 31,443 जणांचे निदान करण्यात आले आहे.