Coronavirus Pandemic: भारतात कोरोनाचा हाहाकार! देशात कोरोना बाधित मृतांचा आकडा 1 लाखांच्या पार तर संक्रमितांची संख्या 64 लाख 73 हजार 545 वर
तर आतापर्यंत एकूण 54,27,707 रुग्णांनी कोरोनाला हरवून बरे (COVID-19 Recovered Cases) झाले आहेत.
भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरश: धुमाकूळ घातला असून देशात कोरोना बाधित मृतांची संख्या 1 लाखांच्या पार गेली आहे. भारतात मागील 24 तासांत 79,476 नवे रुग्ण आढळले असून 1069 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 64 लाख 73 हजार 545 वर (COVID-19 Positive Cases) पोहोचली असून मृतांची संख्या 1,00,842 वर (COVID-19 Death Cases) पोहोचली आहे. केंद्र आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार (Health Ministry of India), देशात सद्य घडीला 9 लाख 44 हजार 996 रुग्णांवर (COVID-19 Active Cases) उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत एकूण 54,27,707 रुग्णांनी कोरोनाला हरवून बरे (COVID-19 Recovered Cases) झाले आहेत.
भारतात 2 ऑक्टोबरपर्यंत कोरोनाचे 7,78,50,403 नमुने घेण्यात आले असून काल दिवसभरात 11,32,675 कोरोना चाचण्या झाल्या अशी माहिती ICMR ने दिली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात असून त्यापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरात मध्ये देखील सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. Coronavirus Vaccine: कोरोनावरील लस येण्यापूर्वी जगभरातील मृतांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता-WHO
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) यांनी कोरोना व्हायरसचे महासंकट वाढत असल्याचे पाहता एक मोठे विधान केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, कोरोनावरील लस येण्यापूर्वी जगभरातील मृतांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बीबीसीच्या मते, डब्लूएचओचे आपत्कालीन प्रमुख माइक रायन यांनी शुक्रवारी असे म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस पावले उचलली गेली नाहीत तर हा आकडा अजून वाढू शकतो.