Coronavirus Update: भारतात कोरोनाचा हाहाकार! देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 54 लाखांच्या पार, मृतांचा आकडा 86 हजारांच्या वर
त्याचबरोबर देशात आतापर्यंत 43 लाख 03 हजार 044 रुग्णांनी (COVID-19 Recovered Cases) कोरोनावर मात केली आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, भारतात मागील 24 तासांत 92,605 नवे रुग्ण आढळले असून 1133 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे देशात कोरोना संक्रमितांची एकूण 54 लाखांच्या पार गेला असून हा आकडा 54,00,620 वर (Coronavirus Positive Cases) पोहोचला आहे. तर मृतांची एकूण संख्या 86,752 (COVID-19 Death Cases) इतकी झाली आहे. देशात सद्य घडीला 10 लाख 10 हजार 824 रुग्णांवर (Coronavirus Active Cases) उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर देशात आतापर्यंत 43 लाख 03 हजार 044 रुग्णांनी (COVID-19 Recovered Cases) कोरोनावर मात केली आहे.
याच धर्तीवर भारतात मागील 24 तासांत 12 लाखांहून अधिक कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. हा आतापर्यंतचा सर्वाधिक रेकॉर्ड आहे. तसेच देशात आतापर्यंत एकूण 6.37 कोटीहून अधिक कोरोना चाचण्या झाल्याची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून जनतेला वेळोवेळी सोशल डिस्ंटसिंग आणि अन्य नियमांचे पालन करावे असे वारंवार आवाहन केले जात आहे. World COVID-19 Cases Update: जगभरात कोरोनाचा हाहाकार! कोरोना बाधितांची एकूण संख्या 3 कोटींच्या पार, तर मृतांचा आकडा 9 लाखांच्या पलीकडे
दरम्यान जगभरातील कोरोना बाधितांची संख्या ही 3 कोटींच्या पार गेली आहे. जगात आतापर्यंत 3 कोटी 6 लाख 97 हजार 734 कोरोनाचे रुग्ण (COVID-19 Positive Cases) आढळले आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 9 लाख 56 हजार 446 वर (COVID-19 Death Cases) पोहोचला आहे. तर दुसरीकडे दिलासादायक गोष्ट म्हणजे जगात आतापर्यंत 2 कोटी 23 लाख 39 हजार 889 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात (COVID-19 Recovered Cases) केली आहे.