Coronavirus Update in India: भारतात COVID-19 रुग्णांची संख्या 36 लाखांच्या पार, मागील 24 तासांत आढळले 78,512 नवे रुग्ण- आरोग्य मंत्रालय

महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 7 लाख 80 हजार 689 वर पोहचली असून मृतांचा आकडा 24,399 वर पोहोचला आहे.

Coronavirus (Photo Credits: Twitter)

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, भारतात (India) मागील 24 तासांत 78,512 रुग्ण आढळले असून 971 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची संख्या 36 लाखांच्या पार गेली असून एकूण संख्या 36 लाख 21 हजार 246 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 64,469 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे दिलासादायक गोष्ट म्हणजे देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असून रिकव्हरी रेट (Recovery Rate) सुधारला आहे. आतापर्यंत देशात 27,74,802 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य घडीला देशात 7,81,975 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात असून त्यापाठोपाठ तमिळनाडू (Tamil Nadu), नवी दिल्ली (New Delhi), गुजरातमध्ये (Gujrat) सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 7 लाख 80 हजार 689 वर पोहचली असून मृतांचा आकडा 24,399 वर पोहोचला आहे. Coronavirus Cases in Maharashtra: मुंबई नंतर महाराष्ट्रातील ‘या' जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण कोरोनाचे बळी, पाहा जिल्हानिहाय आकडेवारी

जगभरातील कोविड-19 एकूणच परिस्थिती पाहता जगात सर्वाधिक कोरोना बाधितांच्या संख्येत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. जगात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत असून त्यापाठोपाठ ब्राझीलमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.