Stock Market News: सेन्सेक्सने ओलांडला 70 हजारांचा टप्पा, निफ्टीचीही विक्रमाकडे वाटचाल
अशा काळात बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex News) आणि एनएसई निफ्टी (NSE Nifty News) हे देखील विक्रमी कामगिरी करत आहेत. सोमवारी (11 नोव्हेंबर) बाजार सुरु झाला तेव्हा किरकोळ वाढीसह सेन्सेक्सने प्रथमच 70,000 चा टप्पा गाठला.
भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market News) अलिकडील काही काळात वारंवार विक्रम करताना पाहायला मिळतो आहे. पाठिमागील तीन वर्षांतील बाजाराचा निर्देशांक सातत्याने वाढिचा राहिला आहे. अशा काळात बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex News) आणि एनएसई निफ्टी (NSE Nifty News) हे देखील विक्रमी कामगिरी करत आहेत. सोमवारी (11 नोव्हेंबर) बाजार सुरु झाला तेव्हा किरकोळ वाढीसह सेन्सेक्सने प्रथमच 70,000 चा टप्पा गाठला. इतिहासात प्रथमच सेन्सेक्सने हा टप्पा गाठला आहे. दुसऱ्या बाजूला NSE निफ्टी-50 ने सुद्धा नवीन उच्चांक गाठला. सकाळी 9:48 पर्यंत, सेन्सेक्स 75.12 अंकांनी वाढून 69,900.72 वर होता आणि निफ्टी 50 ने 22.50 अंकांची किरकोळ वाढ दर्शवून 20,991.90 वर व्यापार केला.
मीडिया, एफएमसीजी, आयटी क्षेत्रातील समभाग वधारले
प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांनी सकारात्मक कल दर्शविल्याचे बाजाराच्या पहिल्या सत्रात पाहायला मिळत आहे. निफ्टी पीएसयू बँक जवळपास 1.5% वाढीसह आघाडीवर आहे. मीडिया, एफएमसीजी, आयटी आणि रिअल्टी समभागांनी देखील व्यापाराच्या सुरुवातीच्या तासांमध्ये वाढ दर्शविली. दरम्यान, पुढच्या काहीच काळात या क्षेत्रातील समभाग स्थिरता दर्शवू लागले. ONGC, कोल इंडिया, इंडसइंड बँक, UPL, आणि अल्ट्राटेक सिमेंट हे निफ्टी 50 वर सर्वाधिक लाभ मिळवणाऱ्यांमध्ये होते. दरम्यान, सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये डॉ. रेड्डीज, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, सिप्ला आणि विप्रो यांचा समावेश होता. (हेही वाचा, Indian Stock Market News: भारतीय शेअर बाजारात खरोखरच तेजी? निफ्टीने गाठला नवा उच्चांक; अभ्यासकांचा तर्क काय? घ्या जाणून)
विदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदीला प्राधान्य
बाजाराची सुरुवात सकारात्मक झाल्याने विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) 3,632.30 कोटी रुपयांच्या समभागांची निव्वळ खरेदी केली, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) 8 डिसेंबर रोजी 434.02 कोटी रुपयांचे समभाग विकले. बाजारातील घडामोडींच्या अभ्यासकांनी 20,700 येवढ्या पातळीवर स्टॉप लॉससह 20,850-20,900 च्या आसपास बाजाराच्या सुरुवातीच्या सपोर्टवर खरेदी-ऑन-डिप्स धोरणाचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. तर दीर्घ पोझिशन्स धारण करणार्या गुंतवणूकदारांना संभाव्य पुढील चढ-उतारासाठी त्यांचे स्टॉप लॉस मागे घेण्याबाबतही काही अभ्यासकांनी सूचवले. अर्थात बाजारातील गुंतवणूक ही नेहमीच अत्युच्च आर्थिक धोका दर्शवताना दिसते. त्यामुळे लेटेस्टली मराठी वाचकांना सूचवते की, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. इतकेच नव्हे तर तुम्ही स्वत:ही अभ्यास करा. कारण ही शेअर बाजारातील गुंतवणूक नेहमीच जोखमीच्या आधीन असते. (हेही वाचा, India’s GDP Growth: विद्यमान आर्थिक वर्षात भाराच्या जीडीपीमध्ये 6.2% वाढीची शक्यता, अर्थव्यवस्था गतीमान: रॉयटर्स पोल)
एक्स पोस्ट
भारतीय शेअर बाजारासाठी कोरोना महामारीचा काळ विशेष लाभकारक ठरला. लॉडाऊनच्या काळात सेन्सेक्स आणि निफ्टीने कधी नव्हे इतक्या वेगाने प्रथमच मोठी कामगिरी केली. या काळात सेन्सेक्स आणि निफ्टीच्या वाढीचा आलेख प्रचंड विक्रमी आणि तेवढाच ऐतिहासिक राहिल्याचे पाहायला मिळाले.