Indian Real Estate Sales Data: 2023 च्या पहिल्या तिमाहीत देशात बंपर घरांची विक्री; 'या' शहरांमध्ये झाली विक्रमी खरेदी, महाराष्ट्रातील दोन ठिकाणांचा समावेश

येत्या तिमाहीतही ही गती कायम राहण्याची अपेक्षा आहे. जे प्रकल्प अधिक चांगल्या सुविधांसह आरोग्य, सुरक्षितता आणि स्वच्छ परिसर यावर लक्ष केंद्रित करतील त्यांच्या ग्राहकांच्या पसंतींमध्ये आणखी वाढ होईल.'

Home (Representative | File Image)

जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत निवासी रिअल इस्टेट (Residential Real Estate) किंवा गृहनिर्माण विभागाच्या (Housing Segment) विक्रीत सतत वाढ दिसून आली आहे. रिअल इस्टेट सल्लागार कंपनी सीबीआरई साउथ एशिया प्रा.लिने (CBRE South Asia Pvt. Ltd) आपला 'इंडिया मार्केट मॉनिटर Q1 2023' अहवाल प्रसिद्ध केला, ज्यामध्ये ही बाब दिसून आली आहे. अहवालात 2022 च्या पहिल्या तिमाहीतील 70,500 युनिट्सच्या तुलनेत 2023 च्या पहिल्या तिमाहीमध्ये संपूर्ण भारतातील निवासी विक्री 78,700 युनिट्सवर दिसून आली.

मुंबई, पुणे आणि दिल्ली-एनसीआरचा जानेवारी-मार्च 2023 मध्ये गृहनिर्माण युनिटच्या विक्रीत एकत्रित वाटा तब्बल 62 टक्के होता. अहवालात असेही नमूद केले आहे की, एकूण 19,000 घरांच्या विक्रीसह मुंबई आघाडीवर आहे, त्यानंतर पुणे (18,000 युनिट्स), दिल्ली-एनसीआर (11,600 युनिट्स) आणि बंगलोर (11,500 युनिट्स) चा नंबर लागतो.

यावर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये रिअल इस्टेटच्या नवीन लॉन्चमध्ये, मुंबई (25,300 युनिट्स), पुणे (16,000 युनिट्स) आणि दिल्ली-एनसीआर (11,200 युनिट्स) यांचा एकत्रितपणे वाटा सुमारे 64 टक्के होता. सीबीआरई भारत, दक्षिण-पूर्व आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिकाचे अध्यक्ष आणि सीईओ अंशुमन म्हणाले की, 'घराच्या मालकीच्या आकांक्षेने या वर्षी आलिशान घरांची मागणी सतत वाढण्याचा अंदाज आहे. येत्या तिमाहीतही ही गती कायम राहण्याची अपेक्षा आहे. जे प्रकल्प अधिक चांगल्या सुविधांसह आरोग्य, सुरक्षितता आणि स्वच्छ परिसर यावर लक्ष केंद्रित करतील त्यांच्या ग्राहकांच्या पसंतींमध्ये आणखी वाढ होईल.' (हेही वाचा: Diesel Cars To Be Banned in India? भारतातील 'या' शहरांमध्ये येणार डिझेल गाड्यांवर बंदी; उत्सर्जन कमी करण्यासाठी सरकारी समितीची शिफारस)

सीबीआरईने पुढे असेही म्हटले की, वर्षाच्या मध्यभागी क्रियाकलापांमध्ये किरकोळ घट होण्याआधी 2023 च्या पहिल्या सहामाहीतदेखील मजबूत विक्री आणि लॉन्च गती कायम राहण्याची अपेक्षा आहे. परंतु त्याचा परिणाम सणासुदीच्या हंगामात कमी होऊ शकतो.