भारतीय रेल्वेकडून 40 हजार लीटर हॅन्ड सॅनिटायझर, 6 लाख फेसमास्क ची निर्मिती
भारतामध्ये कोरोना व्हायरसचा धुमाकूळ असताना त्याला रोखण्यासाठी आता सार्याच स्तरातून मदतीचे हात पुढे येत आहे. भारतीय रेल्वेकडूनदेखील आता आरोग्य यंत्रणा मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
भारतामध्ये कोरोना व्हायरसचा धुमाकूळ असताना त्याला रोखण्यासाठी आता सार्याच स्तरातून मदतीचे हात पुढे येत आहे. भारतीय रेल्वेकडूनदेखील आता आरोग्य यंत्रणा मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या भारतीय रेल्वेकडून पुन्हा वापरता येऊ शकतात असे फेस मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर बनवण्याचं काम रेल्वेच्या झोनलमधून सुरू करण्यात आलं आहे. 7 एप्रिल पर्यंत एकूण 58,2317 पुन्हा वापरता येऊ शकतात असे फेसमास्क तयार करण्यात आले आहेत तर 41,882 लीटर हॅन्ड सॅनिटायझरदेखील बनवले गेले आहेत. Coronavirus Outbreak: घरगुती Reusable Face Cover, Cloth Mask वापरताना या खास टीप्स नक्की लक्षात ठेवा.
भारतीय रेल्वेकडून सध्या आरोग्य विषयक सोयी सुविधा पुरवण्याचं काम सुरू आहे. रेल्वेच्या डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफसाठी 100 PPE बनवण्याचेदेखील काम सुरू आहे. सध्या 17 रेल्वे वर्कशॉपमध्ये PPE बनवण्यासाठी काम सुरू आहे. सध्या कोरोना विरूद्ध लढणार्या निम्म्या आरोग्यक्षेत्राशी निगडीत कर्मचार्यांना त्याचा पुरवठा केला जाणार आहे.
DRDO कडून चालवल्या जाणार्या लॅबमध्ये नुकतेच PPE साठी आवश्यक मटेरियल आणि डिझाईनला मान्यता देण्यात आली आहे. सध्या रेल्वेच्या इस्पितळांमध्ये दाखल कोव्हिड 19 च्या रूग्णांना आवश्यक असलेल्या संरक्षणासाठी खास काळजी घेतली जात आहे. आता PPE चं टेक्निकल स्पेसिफिकेशन झालं असून मटेरियलचा पुरवठा करणारी मंडळीदेखील निवडली गेली आहेत.
सध्या जीवघेण्या कोव्हिड19 ला रोखण्यासाठी आरोग्यक्षेत्रातील अनेक मंडळी जीवावर उदार होऊन रूग्णसेवा देत आहेत. भविष्यात ही निर्मिती प्रक्रिया अधिक वेगवान केली जाणार आहे. सध्या भारतीय रेल्वेचे 2500 ट्रेन कोच हे आयसोलेशन वॉर्डमध्ये बदलले आहेत. यामध्ये 4000 कोरोना रूग्ण राहु शकतात. सध्या प्रतिदिन 375 कोच हे आयसोलेशन वॉर्डमध्ये बदलले जाणार आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)