भारतीय रेल्वे प्रशासनाने भंगार विकून केली करोडो रुपयांची कमाई
भारतीय रेल्वेने (Indian Railway) भंगार (Scrap) सामान विकून करोडो रुपयांची कमाई केली आहे.
भारतीय रेल्वेने (Indian Railway) भंगार (Scrap) सामान विकून करोडो रुपयांची कमाई केली आहे. पश्चिम आणि उत्तर पश्चिम रेल्वे प्रशासनाने त्यांचे भंगार विकले आहे. फक्त या दोन प्रशासानांनी भंगार विकून जवळजवळ 672 करोड रुपयांची कमाई केली आहे. ही कमाई पूर्ण आर्थिक वर्षाची आहे. उत्तर पश्चिम रेल्वेने आर्थिक वर्ष 2018-19 या वर्षात जुने-पुराणे सामान विकून 197.47 करोड रुपयांची कमाई केली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला ही रक्कम 135 करोड रुपये होती. तर 2017-18 वर्षातील ही कमाई पाहता 14.56 टक्क्यांनी याची रक्कम वाढली असल्याचे दिसून आले आहे. उत्तर पश्चिम रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी अभय शर्मा यांनी असे सांगितले की, प्रशासनाकडून जवळजवळ40 हजार मेट्रिक टन भंगार विकण्यात आले आहे.(हेही वाचा-रेल्वे आणि विमानसेवा कंपनीकडून आचारसंहितेचा भंग; निवडणूक आयोगाकडून रेल्वे, उड्डाण मंत्रालयाला कारवाईचे आदेश)
तर पश्चिम रेल्वेने भंगार विकून 537 करोड रुपयांचे भंगार विकले आहे. तर व्यावसायिक कमाई पुरेपुर ठेवण्यासाठी आणि देशभरात प्रथम स्थान मिळवल्याने ऐवढ्या रुपयांचे भंगार विकले आहे. पश्चिम रेल्वे भंगार विकून करोडो रुपयांची कमाई केल्याचा प्रथमच रेकॉर्ड मोडला आहे.