रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! भारतीय रेल्वे आता वेळेवर धावणार
यामुळे प्रवासी रेल्वे जरासुद्धा उशिरा आल्यास त्रस्त होतात.
भारतात (India) रेल्वे वेळेवर येणे ही अश्यक गोष्ट आहे. यामुळे प्रवासी रेल्वे जरासुद्धा उशिरा आल्यास त्रस्त होतात.तसेच रेल्वेचे वेळापत्र कोलमडल्यास अजूनच संताप व्यक्त केला जातो. मात्र आता भारतीय रेल्वे वेळेवर धावणार असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून रेल्वे स्थानकावर पोहचण्यासाठी का उशिर होतो याबद्दलची कारणे सुद्धा शोधून काढली आहेत.
सध्या रेल्वेच्या समस्या सोडवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामध्ये रेल्वे वेळेवर कशा पद्धतीने पोहचतील यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. तर रेल्वे प्रशासनाने उशिरा रेल्वेगाड्या धावत असल्याची कारणे शोधली असता असे समोर आले की, 20 ते 24 बोगी असल्यास पाणी भरण्यासाठी पूर्वी दीड तास लागत होता. परंतु आता स्थानकावर संगणीकृत पाणी भरण्याची प्रणाली सुरु करण्यात आली आहे. यामुळे पाणी भरण्यासाठी वेळ वाचणार आहे.(हेही वाचा-IRCTC सोबत आधार कार्ड कसे लिंक करावे? 12 तिकिटांसाठी बुकिंग करता येणार)
त्याचसोबत रेल्वेने उशिराने धावणाऱ्या रेल्वेच्या तक्रारी दूर करण्यासाठी रॅपिड सी एंड डब्लू ची सुरुवात करण्यात आली आहे. एका अहवालानुसार, उत्तर रेल्वेने दिल्ली आणि अंबाला रेल्वे विभागाला रेल्वेच्या वेळांसाठी 90 टक्के अचूकता आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर कॅगचा अहवालानुसार 2017-18 हे वर्ष रेल्वेसाठी वाईट असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच रेल्वेच्या विकासकामांमुळे रेल्वे उशिरा धावत असल्याचे कारण समोर आले आहे.