Drug Bust Off Gujarat Coast: गुजरात समुद्र किनाऱ्याजवळ 3,300 किलो ड्रग्ज जप्त; NCB आणि नौदलाची कारवाई
भारतीय नौदल (Indian Navy) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरात समुद्र किनाऱ्यावर (Gujarat Coast) एका बोटीतून शेकडो किलो आणि हजारो कोटी रुपयांचे अंमली पदार्थ (Drug) जप्त केले.
भारतीय नौदल (Indian Navy) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरात समुद्र किनाऱ्यावर (Gujarat Coast) एका बोटीतून शेकडो किलो आणि हजारो कोटी रुपयांचे अंमली पदार्थ (Drug) जप्त केले. नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, पोरबंदर लगतच्या समुद्र किनारपट्टीवर एक लहान जहाज आले होते. या जहाजावर सुमारे 3,300 किलो ड्रग्ज साटा होता. जो एनसीबी आणि नौदलाने जप्त केला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये 3089 किलो चरस, 158 किलो मेथाम्फेटामाइन आणि 25 किलो मॉर्फिन होते. जहाजावर असलेले सर्व क्रू मेंबर्स हे पाकिस्तानी नागरिक असल्याची पुष्ठी झाली आहे. अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
जहाजावरील हालचाली संशयास्पद
भारतीय नौदलाने जारी केलेल्या निवेदनानुसार, NCB च्या सहकार्याने आणि भारतीय नौदल यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ड्रग्सची यशस्वी जप्ती शक्य झाली. ताब्यात घेतलेले जहाज आणि चालकासह प्रतिबंधित वस्तू पुढील तपासासाठी भारतीय बंदरकायदा अंमलबजावणी एजन्सीकडे सोपवण्यात आल्या आहेत. भारतीय नौदलाने खुलासा केला की एक संशयास्पद ढो (नौकायन जहाज) सुरुवातीला पोरबंदरजवळील समुद्रात पाळत ठेवणाऱ्या विमानाला दिसले. या जहाजाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. या जहाजाला रोखण्यासाठी आदेश देण्यात आले. दरम्यान, जहाजाला रोखण्यासाठी भारतीय नौदलाचे जहाजही वळविण्यात आले. (हेही वाचा, Pune Drug Girl Video: पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? नशेत बेधुंद असलेल्या तरुणींचा हादरवणारा Video व्हायरल)
अंमली पदार्थ विरोधात देशभरात कारवाई
एनसीबी आणि नौदलाने राबवलेल्या संयुक्त कारवाईत ड्रग्जचा भलामोठा साठा सापडला आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरात नुकताच जवळपास साडेतीन हजार कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा सापडला होता. त्यानंतर देशात झालेली ही सर्वात मोठी कारवाई म्हणून ओळकली जात आहे. अलिकडे एनसीबी आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईत पुणे आणि नवी दिल्लीमध्ये छापे टाकून तब्बल 1,100 किलोग्रॅम मेफेड्रोन जप्त केले, ज्याची किंमत ₹2,500 कोटी आहे. अंमलबजावणीच्या प्रयत्नांमुळे पुण्यात 700 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले, तर दिल्लीत अतिरिक्त 400 किलो प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आला. या समन्वित कृती देशभरातील अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध अंमली पदार्थांच्या व्यापाराशी लढा देण्यासाठी सरकारची वचनबद्धता अधोरेखित करतात. (हेही वाचा- पुण्यात 3700 कोटी रूपयांचे ड्रग्ज जप्त करणाऱ्या पुणे पोलिस पथकाला Devendra Fadnavis यांच्याकडून 25 लाखांचे बक्षीस जाहीर)
एक्स पोस्ट
देशभरामध्ये वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण चिंतेची बाब म्हणून ओळखली जात आहे. अंमली पदार्थांचे सेवन ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. धक्कादायक म्हणजे हे लोन महाविद्यालयीन युवकांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे अनेक बार, पब्ज आणि शालेय आवारातही अंमली पदार्थांचे सेवन करणारी तरुणाई पाहायला मिळते आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)