भारतीय तरुणाने 10 मिनिटात Instargram हॅक करून मिळवले 20 लाखाचे बक्षीस (Watch Video)

Indian Hacker laxman Muthaiyah Hacks Instagram In 10 Minutes (Photo Credits: Youtube, File Image)

फेसबुक (Facebook) कंपनीचे इंस्टाग्राम (Instagram) हे सोशल मीडिया अॅप्लिकेशन म्हणजे आबालवृद्ध सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले आहे, आपल्या रोजच्या आयुष्यातील क्षणाक्षणाचे अपडेट्स आपण या माध्यमातून शेअर करत असतो,पण काहीवेळा या साइट्सच्या प्रणालीमध्ये त्रुटी राहिल्याने सोशल मीडियावरील युजर्सच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. हा  धोका टाळण्याच्या  हेतूने इंस्टाग्राम तर्फे हॅकेथॉन (Hackethon) आयोजित करण्यात आले होते. यामध्ये लक्ष्मण मुथैया (Laxman Muthiyah)  या भारतीय हॅकरने (Indian Hacker) अवघ्या 10 मिनिटांत इंस्टाग्राम हॅक करून दाखवले त्याच्या या कामगिरीसाठी फेसबुक कंपनीने  त्याला 20 लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे.  Public Wi-Fi वापरण्यापूर्वी सुरक्षिततेच्या 'या' टिप्स नक्की लक्षात ठेवा !

लक्ष्मण हा मूळचा तामिळनाडू मधील रहिवाशी असून तो सध्या कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत आहे. हॅकॆथॉन या स्पर्धेत त्याने इंस्टाग्रामला आपल्या प्रणालीतील चूक दाखवून दिली. इन्स्टाग्राम मध्ये पासवर्ड रिकव्हरीमध्ये असलेल्या पासवर्ड रिसेट सुविधेमध्ये ही चूक आढळली. लक्ष्मणने दिलेल्या माहितीनुसार पासवर्ड रिसेट करायचा असल्यास त्या युजरच्या मोबाईलवर 6 आकडी कोड जातो.यात फेरबदल करून हॅकिंग करणे सहज शक्य होते. याबाबत शोध लावण्यासाठी त्याने वेगवेगळ्या आयपी अड्रेसवरून हजाराहुन जास्त रिक्वेस्ट पाठवल्या होत्या. ज्यानंतर अवघ्या दहा मिनिटात त्याने इंस्टग्राम हॅक करून दाखवले.लक्ष्मणने या इंस्टा हॅकिंगचा व्हिडीओही पुरावा म्हणून दिला आहे.

(Watch Video)

इंस्टाग्रामची ही चूक लक्षात येताच फेसबुकने याबाबत तातडीने उपाय शोधण्यास सुरुवात केली आहे, तर या कामगिरीसाठी लक्ष्मणला फेसबुकतर्फे 30 हजार डॉलर म्हणजेच 20.55 लाख रुपये बक्षिसरुपात देण्यात आले आहेत.