Hurun Global Rich List 2021: कोरोना व्हायरस महामारीमध्ये भारताला मिळाले 40 नवे अब्जाधीश; Mukesh Ambani ठरले जगातील सर्वात श्रीमंत आठव्या क्रमांकाची व्यक्ती

याखेरीज, Zcaler या सॉफ्टवेअर कंपनीचे जय चौधरी यांच्या मालमत्तेत मागील वर्षी 274 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि त्यांची संपत्ती 13 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 95,500 कोटींवर पोहोचली आहे

Reliance Industries Limited MD and Chairman Mukesh Ambani | File Image | (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग असूनही 2020 मध्ये देशात अब्जाधीशांची (Billionaires) संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील वर्षी, देशाला 40 नवीन अब्जाधीश मिळाले असून ज्यामुळे देशातील एकूण अब्जाधीशांची संख्या 177 झाली आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्टच्या (Hurun Global Rich List) आकडेवारीनुसार मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि 2020 मध्ये त्यांची संपत्ती 24% वाढली आहे. 15 जानेवारी 2021 पर्यंत त्यांची एकूण मालमत्ता 83 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 6.10 लाख कोटी रुपये आहे. हुरुनच्या यादीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी हे संपूर्ण आशियातील दुसरे श्रीमंत व्यक्ती आहे, तर जगातील आठवे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

मंगळवारी जाहीर झालेल्या 'ग्लोबल रिच लिस्ट 2021' नुसार 68 देशांतील 3,228 अब्जाधीशांपैकी 209 भारतीय आहेत. या भारतीय अब्जाधीशांपैकी 177 लोक देशात राहत आहेत.  मुकेश अंबानीनंतर गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 2020 मध्ये त्यांची संपत्ती दुपटीने वाढली आहे. गौतम अदानी यांच्याकडे 2.35 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे आणि जगभरातील श्रीमंत लोकांमध्ये त्यांचा 48 वा क्रमांक आहे. गेल्या वर्षी त्यांचे भाऊ विनोद अदानी यांची संपत्ती 128 टक्क्यांनी वाढली असून त्यांची एकूण मालमत्ता 72,000 कोटींच्या जवळपास आहे. या अहवालात 15 जानेवारी 2021 पर्यंत अब्जाधीशांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मालमत्ता समाविष्ट आहे. आयटी कंपनी एचसीएलचे शिव नादर 27 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह भारताच्या अब्जाधीशांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे.

आनंद महिंद्रा यांची महिंद्रा ग्रुप प्रॉपर्टी 100 टक्क्यांनी वाढली असून ती 2.4 अब्ज डॉलर्स झाली आहे. याखेरीज, Zcaler या सॉफ्टवेअर कंपनीचे जय चौधरी यांच्या मालमत्तेत मागील वर्षी 274 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि त्यांची संपत्ती 13 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 95,500 कोटींवर पोहोचली आहे. त्याच वेळी, Byju Raveendran आणि त्याच्या कुटुंबाची संपत्ती या काळात 100% पेक्षा अधिक वाढली आणि ती आता 2.8 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे 20,500 कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. (हेही वाचा: Fuel Price Hike in India: इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेल, LPG नंतर आता CNG आणि PNG महागले, जाणून घ्या नवे दर)

महिलांविषयी बोलायचे तर, बायोकॉनच्या किरण मजुमदार शॉ या 4.8 अब्ज डॉलर्ससह देशातील सर्वात श्रीमंत भारतीय महिला आहेत. त्यानंतर गोदरेजच्या स्मिता व्ही कृष्णा (4.7 अब्ज डॉलर्स) आणि ल्युपिनच्या मंजू गुप्ता (3.3अब्ज डॉलर्स) यांचा नंबर लागतो. देशात सर्वाधिक 60 अब्जाधीश मुंबईत राहतात, नवी दिल्लीत 40 आणि बंगळुरूमध्ये 20 जण राहतात.