Corona Warriors: कोरोना व्हायरस सारख्या विषाणूशी लढा देणा-या योद्ध्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज IAF आणि Indian Navy हेलीकॉप्टर्स देशातील हॉस्पिटलवर करणार पुष्पवृष्टी; जाणून घ्या वेळ आणि ठिकाणे
या उपक्रमात सशस्त्र दलांनी विस्तृत व्यवस्था केली आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. मुंबईतील KGM, KEM, JJ आणि INHS ASvini या रुग्णालयांवर आज सकाळी 10 ते 11.30 च्या दरम्यान पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
संपूर्ण देश कोरोना व्हायरससारख्या (Coronavirus) महाभयाण विषाणूशी गेल्या 2 महिन्यांपासून लढा देत आहे. या लढाईत आपल्या प्रयत्नांशी पराकाष्ठा करत डॉक्टर्स, नर्स, रुग्णालयातील कर्मचारी कोरोना बाधित रुग्णांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हायरसने आतापर्यंत संपूर्ण जगभरात लाखांहून अधिक नागरिकांना गिळंकृत केले आहे. अशा या विषाणूला देशातून हद्दपार करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता देशवासियांसाठी अहोरात्र झटणा-या लाखो डॉक्टर, पॅरामेडीक स्टाफ, स्वच्छता कर्मचारी या कोरोना वॉरियरर्सच्या (Corona Warriors) कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज देशभरातील अनेक रुग्णालयांवर इंडियन एअर फोर्स (IAF)आणि इंडियन नेव्हीचे (Indian Navy) हेलिकॉप्टर्स फुलांचा वर्षाव करणार आहेत.
या उपक्रमात सशस्त्र दलांनी विस्तृत व्यवस्था केली आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. मुंबईतील KGM, KEM, JJ आणि INHS ASvini या रुग्णालयांवर आज सकाळी 10 ते 11.30 च्या दरम्यान पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि विशाखापट्टणमच्या जेजे मेमोरियल हॉस्पिटलमध्ये, सकाळी 10 ते सकाळी 10.45 वाजेपर्यंत पुष्पवृष्टी केली जाईल. यावेळी, भारतीय हवाई दलाचे Mi17 हेलिकॉप्टर फ्लायपास्ट करेल. भारतीय हवाई दलाचे Su30s लढाऊ विमान सकाळी साडेदहा वाजता मरीन ड्राईव्हवर फ्लायपास्ट करेल. C130 परिवहन विमान दुपारी 1.15 वाजता मरीन ड्राईव्हवर फ्लायपास्ट करेल. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, मालेगाव येथील कार्यालये, स्टोअर्स, दारूची दुकाने 4 मेपासून उघडणार नाहीत; राज्यातील लॉक डाऊनबाबत महाराष्ट्र शासनाने जारी केले मार्गदर्शक तत्त्वे
आज सकाळी साधारण 9 वाजता दिल्ली आणि इतर अनेक शहरांमध्ये पोलिस स्मारकाला पुष्पहार अर्पण करून, हे आभारप्रदर्शन सुरू होईल. देशभरात लॉकडाउनच्या अंमलबजावणीसाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम राबला जाईल. एअरफोर्स 2 फ्लाय पास्ट करेल, यातील एक श्रीनगर ते त्रिवेंद्रम आणि दुसरे दिब्रूगड ते कच्छ दरम्यान असेल. यामध्ये ट्रान्सपोर्ट आणि लढाऊ विमानांचा समावेश असेल.
दिल्ली-एनसीआरमधील कोरोना वॉरियर्सना सकाळी दहा ते सकाळी साडेदहा या वेळेत हवाई सलामी देण्यात येणार आहे. या दरम्यान, सुखोई -30, मिग -29, जग्वार, सी -130 ट्रान्सपोर्ट विमान यासारखी लढाऊ विमान हवेत कला सादर करतील. दिल्ली, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, गुवाहाटी, पटना आणि लखनऊ या शहरांमध्ये आयएएफची लढाऊ विमाने या उपक्रम राबवतील. श्रीनगर, चंदीगड, दिल्ली, जयपूर, भोपाळ, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, कोयंबटूर आणि तिरुवनंतपुरम अशा अनेक शहरांमध्ये सैन्याच्या वाहतुकीची विमाने अशाच कवायती दाखवतील. भारतीय सैन्याने प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना हॉस्पिटलजवळ बॅन्ड परफॉरमेंस देण्याचा निर्णय घेतला आहे. हे बँड शो सुमारे एक तास चालतील. या माध्यमातून कोरोना वॉरियर्सना सलाम करण्यात येईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)