Trump India Visit: भारत - अमेरिका यांच्यामध्ये झाले 3 अब्ज डॉलर्सचे डिफेंस डील; लवकरच मिळणार अत्याधुनिक अमेरिकन बनावटीची शस्त्र

सुमारे 3 अब्ज डॉलरच्या डिफेंस डीलवर स्वाक्षरी झाल्याची माहिती डोनाल्ड ट्र्म्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

Donald Trump | Photto Credits: Twitter/ ANI

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मध्ये दिल्लीत हैदराबाद हाऊसमध्ये सुरू असलेल्या द्विपक्षीय चर्चेकडे सार्‍यांचे लक्ष लागले होते. या बैठकीत अखेर भारत आणि अमेरिकेमध्ये संरक्षण म्हणजेच डिफेंस डील झाले आहे. सुमारे 3 अब्ज डॉलरच्या डिफेंस डीलवर स्वाक्षरी झाल्याची माहिती डोनाल्ड ट्र्म्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. यावेळेस झालेल्या पत्रकार परिषदेमध्येही ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवादाच्या प्रश्नावरून खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तानामध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांवर लगाम लावणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळेस भारत आणि अमेरिका दरम्यान असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचादेखील उल्लेख केला आहे. सोबतच हा भारत दौरा अविस्मरणीय असल्याचंदेखील म्हटलं आहे.

अमेरिकेसोबत झालेल्या डिफेंस डीलमध्ये अमेरिकेकडून 24 MH60 रोमियो हेलिकॉप्टर च्या 2.6 अब्जअमेरिकी डॉलरच्या खरेदीचा समावेश आहे. सोबत सहा AH 64Eअपाचे हेलिकॉप्टर यांचादेखील समावेश आहे. त्याची किंमत 80 कोटी आहे. यामुळे संरक्षणासोबत आमचे संबंधदेखील अधिक मजबूत होणार असल्याचे डोनाल्ड ट्र्म्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आम्ही भारत- अमेरिका पार्टनरशिपमधील महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा केली असून ऊर्जा क्षेत्रात स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप, ट्रेड आणि पीपल टू पीपल संबंधांवर चर्चा झाली. संरक्षण क्षेत्रामध्येही भारत- अमेरिका दरम्यान मजबूत होत असलेले संबंध आमच्यासाठी फायद्याचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहेत.

ANI Tweet  

कट्टरपंथीय इस्लामी दहशतवादापासून 5 G पर्यंत विविध विषयांवर दोन्ही देशाच्या प्रमुखांनी चर्चा केली. ट्र्म्प यांनी 500% अमेरिका ऊर्जा निर्यात वाढल्याचा दावा देखील यावेळी डोनाल्ड ट्र्म्प यांनी केला आहे