COVID 19 Vaccine in India Updates: रशियामध्ये भारतीय बनवटीचे Sputnik V चे सॅम्पल टेस्ट साठी सज्ज; देशात 2021 पर्यंत तयार होणार 300 मिलियन डोस

भारतातील रशियन एम्बेसीने आज (18 डिसेंबर) माहिती देताना, रशिया आता भारतामध्ये तयार झालेल्या Sputnik V vaccine च्या नमुन्याला वापरण्यासाठी सज्ज झाले आहे. अशी माहिती दिली आहे.

Sputnik V vaccine | (Photo Credits: Yalç?n Sonat / 123rf)

जगभरात युके, कॅनडा, अमेरिका सह काही देशांमध्ये कोविड 19 ला रोखण्यासाठी लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर आता भारतात देखील त्याची प्रतिक्षा आहे. दरम्यान आज देण्यात आलेल्या माहितीमध्ये Russian Direct Investment Fund (RDF)चे CEO Kirill Dmitriev यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात या लसीचे 2021 मध्ये सुमारे 300 मिलियन डोस बनवले जातील. भारतासह जगात अन्य काही देश देखील या लसीच्या निर्मितीमध्ये सहभागी आहेत. ही लस प्रभावी आणि सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

भारतातील रशियन एम्बेसीने आज (18 डिसेंबर) माहिती देताना, रशिया आता भारतामध्ये तयार झालेल्या Sputnik V vaccine च्या नमुन्याला वापरण्यासाठी सज्ज झाले आहे. या लसीच्या मानवी चाचण्यांच्या आहवालानुसार कोविड 19 विरूद्ध ती 95% पेक्षा अधिक प्रभावी असल्याचं सांगितलं जात आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी देखील त्याला दुजोरा दिला आहे.

जागतिक स्तरावर मागील वर्षभरापासून कोरोनाचा थैमान सुरू आहे. या वायरसच्या विळख्यात सुमारे 75 मिलियन लोकं आली आहेत.

भारतामध्ये अद्याप कोणत्याही लसीला तातडीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आली नसली तरीही 3 जणांनी DCGI कडे अर्ज केला आहे. येत्या काही आठवड्यात लसीकरणाला मंजुरी मिळू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केंद्र सरकारनेही लसीकरणाच्या गाईडलाईंस जारी केल्या आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now