Coronavirus in India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 55 लाखांच्या पार; 75,083 नव्या रूग्णांची 24 तासांत भर

सध्या देशातील एकूण कोरोनाबाधितांची आकडेवारी 55, 62,664 इतकी झाली आहे.

Coronavirus प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

भारतामध्ये बघता बघता आता सहा महिन्यांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 55 लाखांच्या पार गेला आहे. आज (22 सप्टेंबर) आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये 75,083 नवे कोरोनारूग्ण समोर आले आहेत तर मृतांचा आकडा 1,053 आहे. सध्या देशातील एकूण कोरोनाबाधितांची आकडेवारी 55, 62,664 इतकी झाली आहे. यापैकी 9,75,861 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 44,97,868 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 88,935 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये 6,53,25,779 सॅम्पलचे निदान झाले आहे. तर काल दिवसभरामध्ये 9,33,185 सॅम्पल तपासण्यात आले त्यापैकी 75,083 चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ANI Tweet

भारतामध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरीही रूग्ण डिस्चार्ज होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. अअज सलग तिसर्‍या दिवशी 90 हजारांपेक्षा अधिक रूग्णांनकोरोनामुक्त करून हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा अजूनही सर्वाधिक आहे. मुंबई, पुणे या शहरांसोबतच आता ग्रामीण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा फैलाव वाढत आहे. परिणामी आरोग्य यंत्रणांवर त्याचा भार आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि हाताची स्वच्छता पाळण्याचं वारंवार आवाहन केले जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif