Coronavirus In India: भारतामध्ये 24 तासांत 64,553 नवे रूग्ण, 1007 जणांचा मृत्यू; एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 24,61,191 पार!
तर सुमारे 1007 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आता 24 लाख 60 हजारांच्या पार गेला आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता 24 तासांत नव्या 64,553 रूग्नांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सुमारे 1007 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भारतामध्ये सध्या 6,61,595 जणांवर कोविड 19 साठी उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 17,51,556 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत भारतामध्ये कोविड 19 ने बळी घेतलेल्यांची संख्या 48,040 पर्यंत पोहचली आहे.
ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये 2,76,94,416 नमुन्यांचे कोविड 19 साठी परीक्षण झाले आहे. 8,48,728 ची तपासणी काल (13 ऑगस्ट) झाली आहे. भारतामध्ये कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत असली तरीही मागील तीन महिन्यांत सातत्याने देशाचा कोविड 19 रिकव्हरी रेट सुधारत असल्याने ही आरोग्य प्रशासनासाठी दिलासादायक बाब आहे.
ANI Tweet
दरम्यान देशामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. काल आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 5 लाख 60 हजार 126 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 19,063 रुग्णांची रुग्णांची कोरोनाविरुद्धची झुंज अयशस्वी ठरली आहे. मुंबई, पुणे, ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रूग्णांत मोठी वाढ बघायला मिळत आहे.