IPL Auction 2025 Live

Coronavirus in India: आज देशात कोविड-19 चे 3,32,730 नवे रुग्ण; 2,263 मृतांची नोंद

कोरोना रुग्णसंख्येत होणारी उच्चांकी वाढ चिंताजनक असून मृतांचा आकडाही वाढत आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने (Coronavirus Second Wave) देशात हाहा:हार घातला आहे. कोरोना रुग्णसंख्येत होणारी उच्चांकी वाढ चिंताजनक असून मृतांचा आकडाही वाढत आहे. मागील 24 तासांत देशात 3,32,730 नव्या रुग्णांची भर पडली असून 2,263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1,93,279 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिली आहे. या नव्या वाढीमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या 1,62,63,695 वर पोहचली असून  1,86,920 मृतांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत एकूण  1,36,48,159 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात 24,28,616 सक्रीय रुग्ण असून 13,54,78,420 लोकांना लस देण्यात आली आहे.

या गंभीर परिस्थितीत देशात रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांची कमतरता जाणवत आहे. आरोग्य सुविधा कमी पडत असल्याने आरोग्य यंत्रणांवरील ताण अधिक वाढला असून रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ANI Tweet:

(हे ही वाचा: Rajesh Tope on Oxygen Supply: केंद्राने ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्राला ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा- राजेश टोपे)

देशातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत. या बैठकीत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजनांबाबत चर्चा केली जाणार आहे. तसंच देशातील प्रमुख ऑक्सिजन निर्मात्यांशी देखील चर्चा करणार आहेत.