COVID 19 Cases In India: भारतात मागील 24 तासात 692 नवे कोरोना रूग्ण तर 6 जण दगावले; एकूण रूग्णसंख्या 4097 वर
3 नमुने तपासले असून दोन ओमिक्रॉन असून एक त्याचा सब व्हेरिएंट JN.1आहे.
भारतामध्ये 692 नव्या कोरोना रूग्णांची (COVID 19 Cases) नोंद मागील 24 तासांत झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात सअध्या 4097 कोविड बाधित रूग्ण आहेत. अधिकृत माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये 6 जणांचा कोविड 19 मुळे मृत्यू (COVID 19 Deaths) देखील झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रात दोघांचा तर दिल्ली, कर्नाटक, केरळ आणि पश्चिम बंगाल मध्ये प्रत्येकी एक रूग्ण दगावला आहे. चैन्नई मध्ये आज अभिनेते Vijaykanth यांचेही निधन झालेले आहे. त्यांची देखील कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
जानेवारी 2020 पासूनची भारतामधील कोरोना रूग्णांची आकडेवारी पाहिली तर ही रूग्णसंख्या 4,50,10,944 वर पोहचली आहे. यामध्ये मागील 24 तासात 702 जणांची भर पडली आहे तर कोविड 19 मुळे दगावलेल्यांचा आकडा 5,33,346 होता त्यामध्ये अजून 6 जणांची वाढ झाली आहे. New Task Force in Maharashtra: कोरोना विषाणूच्या JN.1 या प्रकाराच्या रुग्णांमध्ये वाढ; महाराष्ट्र सरकारकडून नवीन टास्क फोर्सची स्थापना .
दिल्ली मध्ये काल पहिल्यांदा COVID-19 sub-variant JN.1चा रूग्ण आढळला आहे. 3 नमुने तपासले असून दोन ओमिक्रॉन असून एक त्याचा सब व्हेरिएंट JN.1आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, JN.1 sub-variant चे 109 रूग्ण समोर आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्याच्या पुराव्याच्या आधारे JN.1 ने निर्माण केलेला एकंदर धोका कमी आहे.
आरोग्य यंत्रणांकडून नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यामध्ये मास्क लावण्याचं आणि स्वच्छता पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. वाढत्या कोरोनारूग्णसंख्येवर सध्या प्रशासन लक्ष ठेवून आहे.