Coronavirus: भारतात कोरोनाची सक्रीय रुग्णसंख्या 2,706 वर, 265 नव्या रुग्णांची नोंद

देशभरातील सक्रीय कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 2,706 इतकी झाली आहे

Representational Image | (Photo Credits: Pixabay)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून (Union Health Ministry) आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात 265 नव्या कोरोनाव्हायरस (Coronavirus) संक्रमितांची एका दिवसात वाढ झाली. देशभरातील सक्रीय कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 2,706 इतकी झाली आहे. आतापर्यंत देशात कोविड प्रकरणांची एकूण संख्या 4.46 कोटी (4,46,78,649) इतकी नोंदवली गेली आहे.

दरम्यान, आतापर्यंत कोरोना व्हायरस संससर्ग झालेल्या मृतांची संख्या 5,30,705 इतकी नोंदविण्यात आली आहे. पाठिमागील 24 तासांमध्ये केरळमध्ये दोन आणि कर्नाटकमध्ये एक अशा तिगांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी आज सकाळी आठवाजेपर्यंत आलेल्या माहितीवर आधारीत आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.17 टक्के नोंदवला गेला, तर साप्ताहिक पॉझिटीव्हीटी 0.15 टक्के इतकी आहे. पाठिमागील 24 तासांच्या कालावधीत सक्रिय COVID-19 प्रकरणांमध्ये 947 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. (हेही वाचा, India Developed Herd Immunity: भारतात अपयशी ठरेल कोरोनाची लाट; इथल्या लोकांमध्ये तयार झाली आहे हर्ड इम्युनिटी, जाणून घ्या एम्सच्या डॉक्टरांचे मत)

ट्विट

दरम्यान,कोरोना संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,41,45, 238 वर पोहोचली आहे, तर उद्रेक झाल्यापासून एकूण संक्रमितांपैकी 1.19 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 220.10 कोटी डोस देण्यात आले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif