Queen Elizabeth II च्या निधनावर आज भारतात दुखवटा; शासकीय इमारतीवरील झेंडे अर्ध्यावर ते Google चा लोगो देखील Grey!
8 सप्टेंबरला वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
युनायटेड किंग्डम आणि कॉमनवेल्थची महाराणी एलिझाबेझ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्या निधनावर आज (11 सप्टेंबर) भारतामध्ये (India) शोक पाळला जाणार आहे. भारतातील महत्त्वाच्या इमारतींवरील झेंडे अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत. भारतातही आज नागरिक राणीच्या स्मृतीला वंदन करणार आहेत. ऑनलाईन जगतामध्येही आघाडीचं सर्च इंजिन असलेल्या गूगलने (Google) आज त्यांच्या होम पेज वर आपला लोगो राखाडी (Grey) रंगामध्ये करत महाराणीला आदरांजली अर्पण केली आहे.
भारतात आज सरकारी इमारती, लाल किल्ला, राष्ट्रपती भवन येथील झेंडे अर्ध्यावर उतरवले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून भारतामध्ये आज राणीच्या निधनावर दुखवटा पाळला जाईल याची घोषणा करण्यात आली होती.
दरम्यान महाराणी एलिझाबेझ द्वितीय यांचे निधन 8 सप्टेंबर दिवशी स्लॉटलंड मध्ये बालमोरल कॅसल मध्ये स्थानिक वेळ 6.30 च्या सुमारास झाले. त्यांच्या नंतर राजपदाची सूत्रं त्यांचे थोरले सुपुत्र चार्ल्स यांच्या हाती देण्यात आले आहेत. कालच त्यांच्या राजेपदाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. तर विल्यम यांची प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून घोषणा करण्यात आली आहे. Queen Elizabeth II यांच्या निधनानंतर King Charles III यांच्याकडे राजगादीची सूत्रं; पहा पुढील वारसदारांचा क्रम!
महाराणी एलिझाबेझ द्वितीय यांनी वयाच्या 27 व्या वर्षी राजगादीची सूत्रं हाती घेतली होती. 8 सप्टेंबरला वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. 70 वर्ष राजगादीवर बसलेल्या एलिझाबेझ द्वितीय या सर्वात अधिक काळ राजगादीवर बसलेल्या सम्राज्ञी ठरल्या आहेत.