India-Maldives Row: पंतप्रधान मोदींचा अवमान, 'केसरी टूर्स' कडून मालदीवच्या सहली रद्द

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने मालदीववर बहिष्कार टाकण्याचे आणि देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.

Maldive (Image Credit - Pixabay)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भारताबाबत मालदीवच्या (Maldives) मंत्र्यांनी अवमानकारक टिप्पणी केल्याने देशभरात संतापाची लाट पसरली आहे.  यानंतर सोशल मिडियावर #BoycottMaldives सह ट्विट करणे सुरू झाले आहे. विविध क्षेत्रातील अनेक लोकांनी मालदीवच्या मंत्र्यांच्या टिपण्णीबाबत निषेध नोंदवला आहे. या वादानंतर EaseMyTrip ने मालदीवसाठीचे सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केले आहे.  इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने (Indian Chamber Of Commerce) मालदीववर बहिष्कार टाकण्याचे आणि देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.  यानंतर ‘केसरी टूर्स’ने (Kesari Tours) मालदीवच्या सर्व पर्यटन सहली रद्द केल्या आहेत. (हेही वाचा - #BoycotMaldives Trend: इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे मालदीववर बहिष्कार टाकण्याचे आवाहन; EaseMyTrip कडून मालदीवसाठी सर्व फ्लाइट बुकिंग रद्द)

याबाबत केसरी टूर्स कंपनीच्या संचालक झेलम चौबळ यांनी सांगितले की, ‘मालदीव हा भारताचा जुना मित्र असून, पर्यटनाच्या बाबतीत हा देश बव्हंशी भारतावर अवलंबून आहे. मात्र, त्यांनी राष्ट्र म्हणून भारताचा आणि आपल्या पंतप्रधानांचा केलेला अपमान कदापि सहन करणार नाही. एक वर्ष मालदीवच्या पर्यटनाला न गेल्याने भारतीय पर्यटकांना काहीही फरक पडणार नाही.



संबंधित बातम्या

Jasprit Bumrah Defends Mohammed Siraj: जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराजच्या समर्थनार्थ मैदानात उतरला, गोलंदाजाच्या खराब फॉर्मचा केला बचाव

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

Australia vs India 3rd Test 2024: यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर निराश सुनील गावस्कर म्हणाले- क्रीजवर टिकून राहण्याचा प्रयत्न करणे तुमचे काम आहे.

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील