Independence Day 2019 PM Modi Speech Live: जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटविण्याची विरोधकांमध्ये हिंमत नव्हती, आम्ही ती दाखवली - पंतप्रधान मोदी
दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या पंतप्रधानांचे या सत्ताकाळातील हे पहिलेच भाषण आहे. दरम्यान, या सोहळ्यात भारतीय लष्कराचे विविध विभाग आणि बटालीनय लाल किल्ल्यासमोर नेत्रदीपक कवायतीही करत असतात. त्यामुळे या भाषणाचे लाईव्ह अपडेट आम्ही येथे देत आहोत. जाणून घ्या पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील लाईव्ह अपडेट आणि लष्कराच्या कवायतींची क्षणचित्रे.
स्वच्छ भारतासाठी आग्रह धरा. खास करुन दुकानात खरेदीसाठी गेल्यावर प्लॅस्टिक पिशवी मागून नका. तसेच, दुकानदारांनीही दुकानावर फलक लावा प्लॅस्टिक पिशवी मागू नये. पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली सर्वांची जाबाबदारी आहे.
लष्करातील तीन्ही दलांच्या प्रमुखांमध्ये समन्वय साधण्यासाठी 'चीफ ऑफ डिफेन्स' या नव्या पदाची निर्मीती करणार. हे पद लष्कराच्या तिन्ही दल प्रमुखांवर प्रभारी असेन.
देश दहशतवादाविरुद्ध लढतोय. दहशतवादाला पाठिंबा, आश्रय आणि मदत देणाऱ्यांना शिक्षा दिली जाईल. विकासासाठी सुरक्षा आणि स्थिरता महत्त्वाची आहे. केवळ भारत नव्हे तर शेजारील देशही दहशतवादासोबत लढत आहे. बांग्लादेश आणि अफगानिस्तान हे देशही दहशतवादाविरोधात लढत आहेत.
आगामी काळात अर्थव्यवस्था 5 ट्रीलीयन डॉलरवर नेण्याचे सरकारचे लक्ष. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी स्थिर सरकार, स्थिर प्रशासनाची आवश्यकता असते. जर स्थिर सरकार, स्थिर प्रशासन असेल तर अवघे जग विश्वास ठेवते. अर्थव्यवस्थेला चालणा देण्यासासाठी लघु उद्योजकांची ताकद वाढवणे गरजेचे आहे. मध्यम वर्गातील लोकांना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी सूविदा द्याव्या लागतील. तसेच, देशाच्या पर्यटनालाही चालना देणे आवश्यक आहे.
गेल्या 70 वर्षांत जे झालं नाही ते आम्ही 70 दिवसांत करुन दाखवलं. देशाचा विकास हा आधुनिक सोईसुविधांवर करायला हवा. अत्याधुनिक सेवासुविधांसाठी 100 लाख कोटी रुपयांची अवश्यकता आहे. 70 वर्षांमध्ये 2 ट्रीलीयन डॉलर इतक्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत मजल मारू शकलो. मात्र, अवघ्या पाच वर्षांत आम्ही 3 ट्रीलीयन अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचलो. पायाभूत सुविधा जागतिक स्तरावर नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. इज ऑफ डुईंन नंतर आता इज ऑफ लिव्हींग असं सरकाचं धोरण आहे.
सरकार भ्रष्टाचाराविरोधात कडक पावलं टाकत आहे. देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरकार तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. अनेक मोठे अधिकारी आहेत. ज्यांना सरकारने भ्रष्टाचार प्रकरणी घरी बसवले.
वाढती लोकसंख्या हे देशासमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे छोटे कुटुंब सुखी कुटंब हा विचार करणे गरजेचे आहे. अनेक छोटी कुटुंब आहेत. ज्यांनी देशहीताचा आणि विकासाचा विचार केला. आपलं कुटुंब छोटं असणं ही देखील एक देशसेवाच आहे.
देशातून गरीबी हटविण्याची वेळ आली आहे. सरकार त्या दृष्टीने काम करत आहे. पाणी वाचविण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येऊन काम करतील. जलसिंचन, जलजीवन उपक्रम राबवतील. केंद्र आणि राज्य मिळून जल योजनेसाठी 3.5 लाख कोटी रुपये खर्च करतील. पिण्याचे शुद्ध पाणी घराघरात उपलब्ध व्हावे यासाठी सरकार कटीबद्ध आहे.
देशात यापुढे एक देश, एक निवडणूक हे तत्व लागू व्हायला हवे. त्यासाठी वन नेशन, वन इलेक्शन यावर लोकशाही मार्गाने चर्चा व्हायला हवी. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. जीएसटीमुळे वन नेशन वन टॅक्स करण्यात यश आले.
जम्मू काश्मीर राज्यातून कलम 370 हटविल्यानंतर तेथील अदिवासी, महिला, दलित, सर्वसामान्य जनतेला अधिकार मिळाले. हे कलम हटविण्याची विरोधकांमध्ये हिंमत नव्हती. आम्ही ती दाखवली. हे कलम जर इतकेच महत्त्वाचे होते तर, विरोधकांनी बहुमताने सत्तेत असताना ते कायम का केले नाही. तात्पुरते का ठेवले?
तिहेरी तिहेरी विधेयकानं मुस्लिम महिलांना नवा अवकाश मिळाला. देशातील हजारो महिला तिहेरी तलाख भीतीच्या छायेत होत्या. प्रत्येक वेळी तिरेही तलाख होईल असे नाही. पण, तो केव्हाही होऊ शकतो, अशी भीती सातत्याने त्यांच्या मनात होती. तिहेरी तलाक विधेयकाने ती दूर झाली.
आम्ही जेव्हा 2014 मध्ये सत्तेत आलो तेव्हा एक निराशा होती. हा देश बदलू शकेल का असा प्रश्न लोक विचारात होते. सबका साथ सबका विकास या धोरणाने काम करण्यास सुरुवात केली. आज देशात उत्साह दिसतो.
दुसऱ्यांदा सत्तेत येऊन सरकारला 10 आठवडेही झाले नाहीत. परंतू, इतक्या छोट्या कालावधीत सरकारने जम्मू काश्मिरमधून 370 कलम हटवलं. तिहेरी तलाख विधेयक मंजूर करण्यासही यश आलं. सरकार विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहे.
सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषणास सुरुवात केली. आपल्या भाषणात मोदी काय बोलणार याबाबत उपस्थितांसह देशाला उत्सुकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक अशा लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केले. या प्रसंगी देशविदेशातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. काही क्षणांतच करणार देशवासियांना संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वजारोहणासाठी लाल किल्ल्यावर पोहोचले. भारतीय लष्कराने त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिले. लाहोरी गेटमधून पंतप्रधानांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी समाधीस्थळाला भेट दिली आणि त्यांना अभिवादन केले. महात्मा गांधी यांना अभिवादन केल्यावर पंतप्रधान लाल किल्ल्याकडे निघाले. ते थोड्याच वेळात लाल किल्ल्यावर पोहोचतील
Independence Day 2019 PM Modi Speech Live: भारत आज (15 ऑगस्ट 2019) आपला 73 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. अशा या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह देशभरात तेव्हाच खऱ्या अर्थाने सुरु होतो, जेव्हा देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन राष्ट्रध्वज (National Flag) फडकवतात. लाल किल्ला (Red Fort) आणि 15 ऑगस्ट यांचे अतूट नाते आहे. गेली 72 वर्षे ही परंपरा कायम आहे. यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) राजधानी दिल्ली (Delhi) येथील लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवतील. लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवल्यानंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधीत करतात. त्यांच्या या भाषणाबाबत देशभरातून उत्सुकता असते. कारण, सरकारची ध्येय धोरणे, सरकारचे निर्णय, विकास आणि आव्हाने याबाबत अनेक मुद्दे त्यांच्या भाषणात असतात. 2014 आणि त्यानंतर 2019 मध्ये जनमताचा कौल घेऊन एनडीए (NDA) प्रणित भाजप (BJP) सरकार पुन्हा एकदा सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सरकारचे नेतृत्व करत आहेत. आजच्या भाषणात लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातही तिन तलाख, जम्मू-काश्मिर (Jammu and Kashmir) राज्यातून हटवलेले 370 कलम यांसह चांद्रयान, देशात उद्भवलेली पूरस्थिती, दुष्काळ, शिक्षण यांबाबत पंतप्रधान मोदी आपल्या भाषणातून काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे. दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या पंतप्रधानांचे या सत्ताकाळातील हे पहिलेच भाषण आहे. दरम्यान, या सोहळ्यात भारतीय लष्कराचे विविध विभाग आणि बटालीनय लाल किल्ल्यासमोर नेत्रदीपक कवायतीही करत असतात. त्यामुळे या भाषणाचे लाईव्ह अपडेट आम्ही येथे देत आहोत. जाणून घ्या पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील लाईव्ह अपडेट आणि लष्कराच्या कवायतींची क्षणचित्रे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)