Coronavirus in India: भारतात COVID-19 रुग्णांची संख्या 5 लाखांच्या पार! गेल्या 24 तासांत आढळले 18,552 नवे रुग्ण
ही संख्या धक्कादायक असून देशात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.
भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) विषाणूने हाहाकार माजविला असून गेल्या 24 तासांत रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. भारतात (India) काल (26 जून) दिवसभरात 18,552 रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 08 हजार 953 इतकी झाली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 384 नवे रुग्ण दगावले असून देशात मृतांचा आकडा 15,685 वर पोहोचला आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिली आहे. देशात काल 10,244 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात आतापर्यंत 2,95,881 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
देशात सद्य घडीला 1,97,387 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे आरोग्य मंत्रलायने सांगितले आहे. ही संख्या धक्कादायक असून देशात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. Coronavirus Worldometer Tracker: वर्ल्डोमीटर ट्रॅकरनुसार भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येने पार केला 5 लाखांचा टप्पा
देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र राज्यात असून त्यापाठोपाठ नवी दिल्ली, तमिळनाडू, गुजरातमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,52,765 वर पोहोचली आहे.
अनलॉक 1 च्या माध्यमातून सेवा-सुविधा पुन्हा सुरु झाल्या आहेत. आता राज्यात 28 जून पासून सलून व्यवसाय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र 12 ऑगस्ट पर्यंत लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आली असून लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.