Coronavirus In India: केरळमध्ये गेल्या 24 तासात तीन जणांचा मृत्यू तर 292 कोरोनाबाधितांची नोंद
मंगळवारी, 19 डिसेंबर रोजी 292 कोविडबाधितांची नोंद करण्यात आली.
देशात सध्या कोरोना (Kerala Corona Update) पुन्हा एकदा हातपाय पसरत आहे. यामुळे सर्वांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. केरळ राज्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होताना दिसत आहे. मंगळवारी, 19 डिसेंबर रोजी 292 कोविडबाधितांची नोंद करण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता केरळमध्ये 2041 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तसेच एकाच दिवसात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने नागरिकांना न घाबरण्याचे आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. (हेही वाचा - COVID 19 In Thane: ठाण्यात एकाला कोरोनाची लागण; उपचारासाठी रूग्णालयात दाखल)
पाहा पोस्ट -
कोविडचा नवा सबव्हेरियंट भारतात आल्याचं समोर आलं आहे. कोविड-19 चा सबव्हेरियंट JN.1 चं पहिलं प्रकरण केरळमध्ये आढळून आलं आहे. JN.1 व्हेरिएंटचे पहिले प्रकरण समोर आल्याने केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देखरेख ठेवण्यास सांगितले. मंगळवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मुंबईत कोरोनाचे 27 रुग्ण आढळले आहेत. तर, ठाणे जिल्ह्यात 5 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पुण्यात 2 आणि कोल्हापुरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे.
भारतात कोविड-19 च्या JN.1 व्हेरिएंटचा पहिला बाधित 8 डिसेंबर रोजी केरळमध्ये नोंदवले गेले. यापूर्वी, तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील एका प्रवाशाला सिंगापूरमध्ये JN.1 प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले होते.