India-China Border Tension: लडाख नंंतर आता अरुणाचल प्रदेशात सुद्धा चीनी सैनिकांंची हालचाल, भारतीय जवानही सज्ज
अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) दर्या खोर्यांच्या भागात चीनी सैनिक अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत जे पाहता भारतीय सैन्य देखील सज्ज ठेवण्यात आले आहे.
नवी दिल्ली: भारत आणि चीन मध्ये सुरु असणारा तणाव (India- China Tension) आता दिवसागणिक गंंभीर होत आहे. दोन्ही देशांंकडुन कोणी आधी LAC ओलांंडली यावरुन एकमेकांंवर आरोप लगावले जात आहे. आज संरक्षण मंंत्री राजनाथ सिंंह (Rajnath Singh) यांंनी सुद्धा लडाखमधील भारताची 38 हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन अनधिकृतपणे चीनने बळकावल्याची माहिती दिली, याच सर्व परिस्थिती मध्ये आता लडाख (Ladakh) पाठोपाठ अरुणाचल प्रदेशात सुद्धा चीनी सैनिकांंची हालचाल दिसुन येत आहे. अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) दर्या खोर्यांच्या भागात चीनी सैनिक अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, भारत चीन सीमारेषेवर LAC पासुन 20 किमी दुर वर चीन ने बनवलेल्या रस्त्यांंवर सुद्धा हालचाल दिसुन येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, सध्या अरुणाचल प्रदेशातील आसफिला क्षेत्र, टूटिंग एक्सिस भागात चीन सैनिक दिसुन आले होते.भारतीय सैन्य सुद्धा या हालचालींंवर लक्ष ठेवून आहे. चीन च्या बाजुने जर कोणतीही चुकीची चाल केली गेली तर भारतीय सैन्य त्यांंना जवाब देण्याच्या तयारीत आहे असा विश्वास संरक्षण मंंत्रालयाकडुन वर्तवण्यात आला आहे.
ANI ट्विट
दरम्यान, भारत व चीन मधील तणावपुर्ण परिस्थीती नियंंत्रणात ठेवण्यासाठी दोन्ही देशांंकडुन उच्च स्तरीय बैठका घेतल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय शांंततेसाठी दोन्ही देशाच्या सहाकार्याची गरज आहे अशी भुमिका आज राजनाथ सिंंह यांंनी आपल्या भाषणात संंसदेत मांंडली होती.