भारतात गेल्या 24 तासात 7 लाखांहून अधिक COVID19 च्या सॅम्पल्सची टेस्ट, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची माहिती
त्याचसोबत कोरोनाबाधित रुग्णांवर देशातील सर्वच डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून उपचार करण्यात येत आहेत.
देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा 21 लाखांच्या पार गेला आहे. यामुळे सरकारकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचसोबत कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरु नये म्हणून योग्य वेळीच खबरदारी घेण्यात आली आहे. याच दरम्यान आता भारतात गेल्या 24 तासात 7 लाखांहून अधिक सॅम्पल्सची टेस्ट करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. त्याचसोबत कोरोनाबाधित रुग्णांवर देशातील सर्वच डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून उपचार करण्यात येत आहेत. त्याचसोबत कोविड योद्धे सुद्धा कोरोनाच्या संकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत.
भारतात आतापर्यंत जवळजवळ 2,41,06,535 कोरोनाच्या चाचण्या पार पडल्या आहेत. तर नव्याने सुद्धा काही ठिकाणी चाचणी केंद्रे उभारण्यात आल्या आहेत. त्याचसोबत कोरोनाच्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून कोविड आणि क्वारंटाइन सेंटर्स उभारले ही जात आहेत.देशात अनलॉक 3 ला सुरुवात झाली असून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आणण्यात येत आहे. कोविड-19 संकटामुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. त्यामुळे कोरोनाच्या लसीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(किराणा दुकानांमध्ये काम करणारे कामगार, भाजी आणि अन्य विक्रेत्यांची COVID19 ची चाचणी घेण्याची राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सूचना)
दरम्यान, मागील 24 तासांत 64,399 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 861 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 21,53,011 वर पोहचला आहे. त्यापैकी 6,28,747 अॅक्टीव्ह केसेस असून 14,80,885 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर कोरोना संसर्गामुळे बळी गेलेल्यांची संख्या 43,379 इतकी आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.