IPL Auction 2025 Live

2018-2019 या आर्थिक वर्षामध्ये तिसर्‍यांदा GST कलेक्शनने पार केला 1 लाख कोटीचा टप्पा

जानेवारी 2018 मध्ये 89825 कोटींचं उत्पन्न झाले होते.

GST | Representational Image | (Photo Credits: PTI)

जानेवारी 2019 मध्ये एकूण 1 लाख कोटीपेक्षा अधिक जीएसटी गोळा करण्यात आला आहे. यामध्ये 17,763 कोटी CGST, 24826 कोटी SGST आणि 51225 कोटी IGST तर 8690 कोटी रूपये Cess च्या माध्यमातून गोळ्या करण्यात आले आहेत. 2018-19 च्या तिमाहीचा जीएसटी रेव्हेन्यू गोळा करण्यात आला आहे.

2018 -2019 या आर्थिक वर्षामध्ये तिसर्‍यांदा जीएसटी रेव्हेन्यूने 1 लाख कोटीचा टप्पा पार केला आहे. डिसेंबर ते 31 जानेवारी2019 या कालखंडामध्ये 73.3 लाख GSTR गोळा करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात कराच्या माध्यमातून झालेल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यात 36107 CGST आणि 39503 SGST इतका टॅक्स गोळा करण्यात आला आहे.

जानेवारी 2019 मधील उत्पन्न हे जानेवारी 2018 च्या तुलनेत सुमारे 14% अधिक आहे. जानेवारी 2018 मध्ये 89825 कोटींचं उत्पन्न झाले होते.