Weather Forecast India: देशभरात मुसळधार पाऊस अपेक्षीत, आयएमडीचा ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, असमसह विविध राज्यांना सतर्कतेचा इशारा
ज्यामध्ये ओडिशा (Odisha Weather Forecast) , पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, या भागात मुसळधार पाऊस (Heavy Rainfall,) पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) देशभरातील विविध राज्यांसाठी हवामान अंदाज (Weather Forecast) जारी केला आहे. ज्यामध्ये ओडिशा (Odisha Weather Forecast) , पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, या भागात मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दक्षिण उत्तर प्रदेश ते बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील तीन दिवसांत जोरदार मुसळधार पावसा शक्यता (Weather Forecast India) वाढली आहे. परिणामी ज्या प्रदेशात मुसळधार पाऊस अपेक्षीत आहे, त्या प्रदेशात पूरजन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
ओडिशामध्ये मुसळधार पाऊस
भुवनेश्वरचे IMD संचालक मनोरमा मोहंती यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले की, ओडिशाच्या बहुतांश भागात पुढील 24 तासांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान अंदाज वर्तवला आहे. गेल्या 24 तासांत, सहा ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली असून, संबलपूरमधील बामरा येथे सर्वाधिक 167.8 मिमी पाऊस झाला आहे. बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे, सहा ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. तीन भागात मुसळधार पावसाची नोंद झाली, संबलपूरमधील बामरा येथे सर्वाधिक पाऊस झाला, असे मोहंती पुढे म्हणाले. ओडिशातील मयूरभंज, केंदुझार, ढेंकनाल, अंगुल, जाजापूर, केंद्रपारा, कटक आणि जगतसिंगपूरसह ओडिशाच्या ईशान्येकडील जिल्ह्यांसाठी IMD ने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य पूर आणि भूस्खलनापासून सावध राहण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे. आपल्या विस्तारित अंदाजामध्ये, IMD ने ओडिशामध्ये 27 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. (हेही वाचा, Weather Forecast Maharashtra: पुणे, सातारा, घाट परिसरात मुसळधार पाऊस, IMD कडून सतर्कतेचा इशारा, जाणून घ्या मुंबई, ठाण्याचा हवामान अंदाज)
ईशान्य भारतात हलका ते मध्यम पाऊस
दरम्यान, हवामान खात्याने या आठवड्यात पूर्व आणि ईशान्य भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, या भागासोबतच, झारखंड आणि अंदमान निकोबार बेटे, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुराच्या काही भागांमध्ये खूप मुसळधार ते अत्यंत त मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मान्सून महाराष्ट्रात पुन्हा सक्रीय
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून, विविध ठिकाणी तो आपले दमदार आस्तित्व दाखवून देत आहे. परिणामी आयएमडीने सतर्कतेचा इशारा दिला आहे. IMD पुणे येथील शास्त्रज्ञ एस.डी. सानप यांनी म्हटले आहे की, राज्यभरात सुरु असलेल्या असलेल्या मुसळधार पावसामुळे येत्या काही दिवसांत आणखी भूस्खलन होण्याची शक्यता आहे, असा इशारा आयएमडीने दिला आहे. दरम्यान, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्येही पाऊस आपली हजेरी दर्शतो आहे.