Weather Forecast India: महाराष्ट्र, केरळ, हिमाचल प्रदेशसह भारतातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस; IMD चा हवामान अंदाज

सध्या देशभरात मान्सून (Monsoon 2024) प्रवाह सक्रिय आहे. पुढचे चार ते पाच दिवस मान्सूनची स्थिती स्थिर राहण्याची चिन्हे आहेत

Weather Forecast | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडी (IMD) ने नवा हवामान अंदाज (Weather Forecast) वर्तवताना म्हटले आहे की, भारतातील (India) विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस ( Heavy Rainfall) अपेक्षीत आहे. सध्या देशभरात मान्सून (Monsoon 2024) प्रवाह सक्रिय आहे. पुढचे चार ते पाच दिवस मान्सूनची स्थिती स्थिर राहण्याची चिन्हे आहेत. परिणामी विविध प्रदेशांमधील हवामानावर त्याचा प्रभावी परिणाम पाहायला मिळेल. खास करुन, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक आदी राज्यांमध्ये हलका, मध्यम ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. वाचकांच्या माहितीसाठी असे की, आयएमडीने मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मुसळधार पावसाचा अंदाज

कमी दाबाचे क्षेत्र

पश्चिममध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर 19 जुलैच्या सुमारास नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा हवामान अंदाज  आहे. यामुळे पुढील 4-5 दिवस द्वीपकल्पीय आणि मध्य भारतात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Weather Forecast Mumbai: मुंबईत दमदार पाऊस, पुढचे 4-5 तास महत्त्वाचे; लोकल रेल्वे सेवेस विलंब, सकल भागात साचले पाणी; जाणून घ्या हवामान अंदाज)

आयएमडीकडून प्राप्त प्रादेशिक सूचना

मुंबई:

महाराष्ट्र:

दिल्ली:

हिमाचल प्रदेश:

केरळ:

आंध्र प्रदेश:

विशाखापट्टणम चक्रीवादळ इशारा केंद्राच्या श्रीनुवास एमडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत, विशेषतः अल्लुरी सीताराम राजूमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. पावसामुळे उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती विचारात घेऊन सुरक्षीत राहा. पावसाळ्यात सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif