Home Remedy Acidity: अपचन- अ‍ॅसिडीटीचा त्रास होत असल्यास 'हे' घरगुती उपाय करा

उन्हाळ्यात उष्णतेमुळे पोटात गॅस होणे आणि पोट दुखीचे प्रमाण वाढते. त्याच बरोबर उन्हाळ्यात जास्त जेवण करू वाटत नाही त्यामुळे अॅसिडीटीचा त्रास होत असतो.

indigestion-acidity PC PIXABAY

Home Remedy Acidity: आपल्या शरिरात पचनशक्ती योग्य असली की, अनेक रोगांपासून दूर राहतो. उन्हाळ्यात उष्णतेमुळे पोटात गॅस होणे आणि पोट दुखीचे प्रमाण वाढते.  त्याच बरोबर उन्हाळ्यात जास्त जेवण करू वाटत नाही त्यामुळे अॅसिडीटीचा त्रास होत असतो. रात्री उशिरा जेवण करणं हे महत्त्वाचे कारण आहे पोट गॅस तयार होण्याचे. याच अॅसिडिटी आणि अपचनच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही उपाय ट्राय केले पाहिजेत. (हेही वाचा- भारतातील कीमा, दाल तडका, शाही पनीर, मिसळसह 9 पदार्थ जगातील टॉप डिशेसमध्ये समाविष्ट; पहा जगातील सर्वोत्कृष्ट 'स्टू'जची यादी (View Post)

ब्रेड, मैदा आणि बेसन युक्त पदार्थ खाणे टाळा. या पदार्थांमुळे पोट गच्च होतं आणि अपचनाला त्रास होतो. अॅसिडीटीमुळे आंबट ढेकर, मळमळ आणि उलटी सारखे वाटते त्यामुळे दिवसभर अस्वस्थ वाटू लागते.

१. योग्य आहार- उन्हाळ्यात योग्य आहार घेणे महत्त्वाचे असते. त्यामुळे शरिरात बराच वेळ ऊर्जा ठिकून राहते. आहार फळांचा उपयोग करा. योग्य आहार जर योग्य वेळेवर घेतला तर अपचनाचा त्रास कमी होता. रात्रीच्या जेवणात आणि झोपण्यात कमी एक ते दोन तासांचा गॅप ठेवा. लगेच खाऊन झोपू नयेत. जेवल्यानंतर गुळ किंवा ताकाचे सेवन करा.

२. व्यायाम- उन्हाळ्यात कमी कामात देखील शरिर जास्त थकते. त्यामुळे ऊर्जा युक्त पदार्थ खा. सायंकाळी किंवा सकाळी दररोज व्यायाम करा. नेहमी सकाळी अर्धा तास चाला. त्यामुळे रात्रीचे जेवन पचण्यास मदत होते.

३. बडीशेप- बडीशेप चावून खाल्याने पोटाच्या समस्या दूर होता. उन्हाळ्यात बडीशेपचे पाणी पिऊ शकता ज्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल. बडीशेप मुळे गॅस आणि अपचनाच्या त्रास कमी होतो.

आरोग्य खुप महत्त्वाचं आहे, आणि त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आपल्याला आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, योग, आणि स्वस्थ आहाराचं सेवन करणं आवश्यक आहे.  तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.