Chanda Kochhar Arrested by CBI: आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चांदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयकडून अटक
आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ (Former ICICI Bank CEO) चंदा कोचर (Chanda Kochhar Arrested by the CBI) आणि त्यांचे पती दीपक (Deepak Kochhar Arrested ) कोचर यांना सीबीआयने आज अटक केली आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ (Former ICICI Bank CEO) चंदा कोचर (Chanda Kochhar Arrested by the CBI) आणि त्यांचे पती दीपक (Deepak Kochhar Arrested ) कोचर यांना सीबीआयने आज अटक केली आहे. खाजगी क्षेत्रातील बँकेचे प्रमुख असताना व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या कर्जामध्ये अनियमितता केल्याच्या आरोपांच्या चौकशीचा एक भाग म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेमुळे बँकींग आणि औद्योगीक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
चंदा कोचर (वय वर्षे 59) यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये ICICI बँकेच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यावर आयसीआयसीआय बँकेतून कर्ज वितरण करताना व्हिडिओकॉन समूह (Videocon Group), ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि तेल आणि वायू शोध कंपनीला (Consumer Electronics and Oil and Gas Exploration Company) अनुकूलता दर्शवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. (हेही वाचा, चंदा कोचर यांच्या ‘बायोपिक’ प्रदर्शनावर दिल्ली उच्च न्यायालयाची बंदी)
दरम्यान, सीबीआयने चंदा कोचर यांच्यवर आरोपी ठेवला आहे की, त्यांनी ICICI बँकेसाठी नॉन-परफॉर्मिंग अॅसेट बनलेल्या व्हिडिओकॉन समूहाला 2012 मध्ये ₹ 3,250 कोटींच्या कर्जामध्ये गुन्हेगारी कट रचला आणि ग्राहकांची फसवणूक केली. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या व्यवहारातून फायदा झाल्याचा आरोप एका व्हिसलब्लोअरने केला होता. त्यानंतर हे प्रकरण चौकशीच्या फेऱ्यात अडकले.
ट्विट
चंदा कोचर हे नाव पाठीमागील तीन दशकांपासून बँकींग क्षेत्रात मोठ्या आदराने घेतले गेले. त्यांनी तीन दशकांहूनही अधिक काळ भारतातील तिसर्या क्रमांकाच्या मोठ्या कर्जदात्यामध्ये काम केले. त्या एक यशस्वी बँकर आहेत. त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)