भारतीय तरुणाचा लंडन मध्ये जीवघेण्या हल्ल्यात मृत्यू , सुषमा स्वराज यांच्याकडे कुटुंबाने घेतली मदतीसाठी धाव
हैद्राबादी तरुणावर लंडनमध्ये कामाच्या ठिकाणी सुऱ्याने भोसकल्याच्या घटनेत प्राण गमवावे लागले, यानायटर त्याच्या कुटुंबाने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.
नवी दिल्ली, १० मे: हैदराबादचा (Hyderabad) मूळ रहिवाशी मोहम्मद नदीमुद्दीन (Mohd Nadeemuddin) याने लंडन (London) मध्ये जीवघेण्या हल्ल्यात प्राण गमावल्याने त्याच्या कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्री (External Affairs Minister) सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. कुटुंबाला तातडीने लंडनला जाण्यासाठी व्हिजा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी स्वराज यांच्याकडे केली जातेय.
सूत्रांच्या माहितीनुसार नदीम मागील सहा वर्षांपासून युनाइटेड किंगडम मधील टेस्को सुपरमार्केट मध्ये नोकरी करत होता, बुधवारी संध्याकाळी कामावरून घरी परतत असताना स्लोवघ (Slough) मध्ये त्याला अज्ञात व्यक्तीने सुऱ्याने भोसकल्याने त्याचा मृत्यू झाला.घटना घडल्यानंतर तात्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली असून सध्या मारेकऱ्यांचा तपास सुरु आहे.
लोकसभा निवडणूक यापुढे लढवणार नाही: सुषमा स्वराज
ANI ट्विट
वृत्त वेबसाईटच्या माहितीनुसार काहीच महिन्यांपूर्वी नदीमची पत्नी त्याच्यासोबत राहण्यासाठी लंडन येथे गेली होती, बुधवारी नदीम कामावरून सुटल्यावर बराच वेळ घरी न आल्याने, काळजीत असलेल्या त्याच्या पत्नीने सुपरमार्केट मध्ये फोन करून विचारणा केली. त्यानंतर सुपरमार्केट मधील अधिकाऱ्यांनी तपास केला असता, मार्केटमधील कार पार्किंगच्या जागेत एका अज्ञात व्यक्तीने सुऱ्याने भोसकून त्याचा खून केला असल्याचे समजले, अशी माहिती नदीमचा मित्र फहीम कुरेशी याने माध्यमांना दिली.
न्युझीलंड मधील क्राइस्टचर्च येथील गोळीबारात भारतीय जखमी; सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीचे आवाहन
दरम्यान या घटनेने धक्का बसलेल्या नदीमच्या गरोदर पत्नीवर मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्यात आले आहे तसेच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महसूद अली यांचे नदीमच्या कुटुंबियांना तातडीने लंडनला रवाना करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.