Hurun India Wealth Report 2020 जाहीर; देशात 4.12 कुटुंब कोट्याधीश; मुंबई यादीमध्ये अव्वल स्थानी
भारतामध्ये महराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात या 5 राज्यांच्या विचार करता देशातील एकूण 46% या 5 राज्यांत राहत असल्याचं समोर आले आहे.
महाराष्ट्रासह देशात नवमध्यम वर्गाची संख्या वाढत असल्याचं चित्र हुरून इंडियाने (Hurun India) प्रसिद्ध केलेल्या एका अहवालामधून समोर आले आहे. हुरून इंडियाने काल (16 मार्च) भारतातील श्रीमंत व्यक्तींचा अहवाल 2020 जाहीर केला आहे. त्यांच्या माहितीनुसार, देशात सर्वाधिक 56,000 कोट्याधीश महाराष्ट्रातील (Maharashtra) आहेत. महराष्टातही मुंबईमध्ये कोट्याधीश सर्वाधिक आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ देशात सर्वाधिक कोट्याधीश हे उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांमध्ये आहेत. तर भारतामध्ये एकूण 4.12 कोट्याधीध असल्याचे देखील हुरून इंडियाच्या माहितीमधून समोर आले आहे.(हेही वाचा: कमाईच्या बाबतीत Gautam Adani यांनी Elon Musk, Jeff Bezos यांनाही टाकले मागे; नेट वर्थच्या वाढीबाबत ठरले अव्वल).
दरम्यान भारतामध्ये महराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात या 5 राज्यांच्या विचार करता देशातील एकूण 46% या 5 राज्यांत राहत असल्याचं समोर आले आहे. महाराष्ट्रात एकूण 56 हजार कोट्याधीश आहेत. तर उत्तर प्रदेशात 36 हजार कोट्याधीश आहेत. तामिळनाडू मध्ये 35 हजार कोट्याधीश राहतात. कर्नाटकात 33 हजार कोट्याधीश राहतात आणि गुजरात मध्ये राहणार्या कोट्याधीशांची संख्या 29 हजार कोटी आ हे.
हुरून इंडिया देशातील श्रीमंत व्यक्तींची यादी दरवर्षी प्रसिद्ध करते. मागील वर्षी भारतामध्ये 4.12 लाख कोट्याधीश होते. भारतात जर एका कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 7 कोटी च्या जवळ असेल तर त्या कुटुंबाला मिलियन डॉलर्स कुटुंब म्हटलं जातं. भारताचं आर्थिक गणित पाहता देशाच्या जीडीपीच्या 16% जीडीपी महाराष्ट्रामधून येतो. त्यामुळेच देशाच्या आर्थिक घडामोडीमध्ये राज्याचं महत्त्व अधिक आहे.
काही दिवसांपूर्वी हुरून इंडिया ने प्रसिद्ध केलेल्या माहितीमध्ये मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांचि संपत्ती 83 अब्ज डॉलर आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये मुकेश अंबानी 11 व्या स्थानी आहेत.