Ration Card: रेशन कार्डमध्ये 'या' पद्धतीने दाखल करा मुलांची नावे, जाणून घ्या महत्वाच्या कागपत्रांबद्दल अधिक
जे सरकारद्वारे फक्त फक्त देशातील नागरिकांना दिले जाते. रेशन कार्डमध्ये दिलेल्या माहितीचा उपयोग सरकारी योजनांचा लाभ घेण्यसाठी केला जातो.
How to add the name of the child to the Ration Card: सध्या रेशन कार्ड एक आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे. जे सरकारद्वारे फक्त फक्त देशातील नागरिकांना दिले जाते. रेशन कार्डमध्ये दिलेल्या माहितीचा उपयोग सरकारी योजनांचा लाभ घेण्यसाठी केला जातो. हे कायद्यानुसार मान्यताप्राप्त ओळखपत्र आणि अॅड्रेस प्रुफ म्हणून सुद्धा वापरले जाते. तर सामान्य नागरिकांना रेशन सुद्धा याच कार्डचा माध्यमातून दिले जाते. जे या सरकारी कागदपत्राचे मुख्य उद्दिष्ट आहे.(Covid-19 Vaccination Certificate Verification: कोविड 19 वॅक्सिनेशन सर्टिफिकेट खरं की खोटं हे ऑनलाईन कसे तपासाल?)
रेशान कार्डवर परिवारातील सर्व सदस्यांची नावे असतात. जशी जशी कुटुंबात वाढ होत जाते त्यानुसार, नव्या सदस्यांचे नाव जोडणे आवश्यक असते. जेव्हा लग्नानंतर परिवार मध्ये वाढ होते किंवा एखादे नवे मुल जन्माला येते तेव्हा त्याचे नाव रेशन कार्डमध्ये दाखल करणे गरजेचे असते.
रेशन कार्डमध्ये मुलांची नावे कशी दाखल कराल?
जर तुमच्या परिवारात एखाद्या मुलाचा जन्म झाल्यास त्याचे नाव रेशन कार्डवर दाखल करण्यासाठी प्रथम आधार कार्ड तयार करावे लागेल. आधार कार्ड शिवाय मुलांची नावे रेशन कार्डमध्ये जोडता येणार नाहीत. आधार कार्ड तयार करण्यासाठी मुलांचा जन्मदाखला याची आवश्यकता असते. सर्व कागदपत्र एकत्रित केल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांची नावे रेशन कार्डमध्ये दाखल करण्यासाठी अर्ज करु शकता.
तुमच्या घरातील नव्या सदस्याचे नाव ऑनलाईन सुद्धा जोडले जाऊ शकते. त्यासाठी आपल्या राज्यातील खाद्य वितरकाची अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. तेथे नव्या व्यक्तीचे नाव जोडण्यासंबंधित सर्व ऑप्शन मिळणार आहेत. दरम्यान, अद्याप सर्व राज्यांकडून ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. उत्तर प्रदेशात रेशन कार्ड संबंझित ऑनलाईन सेवांचा फायदा घेण्यासाठी https://fcs.up.gov.in/FoodPortal.aspx या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.(In-Car Dining: 'हे' राज्य सुरु करत आहे 'कार डायनिंग'ची सुविधा; जाणून घ्या नक्की काय आहे संकल्पना)
उल्लेखनीय आहे की, केंद्र सरकारने जनतेच्या सुविधेसाठी वन नेशन वन रेशन कार्डची व्यवस्था लागू केली आहे. या व्यवस्थेअंतर्गत कोणत्याही राज्यात रेशन कार्डचा वापर रेशन घेण्यासाठी व्यक्तीला करता येणार आहे. अशातच तुम्ही सुद्धा तुमच्या प्रत्येक सदस्याचे नाव रेशन कार्डमध्ये दाखल करुन घ्या.