Covid-19 Vaccination: देशातील लहान मुलांच्या लसीकरणासाठी किती वेळ लागणार? AIIMS Director रणदीप गुलेरिया यांनी दिले 'हे' उत्तर

त्यामुळे मुलांना संसर्ग होण्याची चिंता देखील वाढली आहे. यात एम्स संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

देशातील कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) शिथिल होत असल्याचे वाटतानाच पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. सध्या कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या कमी असल्याने सक्रीय रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आज देशात 47,092 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 509 रुग्णांचा बळी गेला आहे. तर 35,18 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी देशातील अनेक राज्यांमधील शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे मुलांना संसर्ग होण्याची चिंता देखील वाढली आहे. यात एम्स संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (AIIMS Director Randeep Guleria) यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

गुलेरिया म्हणाले की, संसर्गाचा दर कमी असलेल्या ठिकाणी शाळा सुरु करता येतील. देशातील लहान मुलांचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी 9 महिन्यांहून अधिक काळ लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत शाळा बंद ठेवू नये. शाळेतील शिक्षकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्यास परिस्थिती उत्तम राहील. तसंच कोरोनाची लस घेतलेल्या शिक्षकांना लस घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

त्याचबरोबर सुरु झालेल्या शाळांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, शाळा सुरु झालेल्या राज्यांच्या सरकारने शाळांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोरोनाची स्थिती नियंणात राहील आणि मुलंही सुरक्षित राहतील. (Covid-19 Vaccination in India: डिसेंबर 2021 पर्यंत देशातील सर्व प्रौढांचे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न- केंद्र सरकार)

दरम्यान, राज्यात सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण 5 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच शाळा सुरु करण्याबाबत दोन दिवसांत निर्णय होईल, असे मंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif