Tamil Nadu Train Accident: म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेस मालगाडीला कशी धडकली? समोर आले खरे कारण? वाचा

ही घटना 11 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे. तामिळनाडूतील कावरपेट्टई येथे शुक्रवारी म्हैसूरहून दरभंगाला जाणाऱ्या बागमती एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले.

Tamil Nadu Train Accident (फोटो सौजन्य - PTI)

Tamil Nadu Train Accident: म्हैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेस (Mysore-Darbhanga Bagmati Express) आणि तमिळनाडूच्या तिरुवल्लूरमध्ये मालगाडीची धडक झाल्याने शुक्रवारी मोठा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेल्या रेल्वेचा अपघात झाल्याने अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना 11 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे. तामिळनाडूतील कावरपेट्टई येथे शुक्रवारी म्हैसूरहून दरभंगाला जाणाऱ्या बागमती एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले. रात्री 8.27 वाजता तिरुवल्लूर जिल्ह्यातील चेन्नईजवळील पोनेरी स्टेशन ओलांडत असताना एलएचबी कोच असलेली एक्स्प्रेस ट्रेनला रात्री 8.27 वाजता अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या.

प्राथमिक तपासानुसार मेन लाईनवर जाण्याऐवजी लूप लाईनवर स्विच केल्याने ही टक्कर झाली असावी. ट्रेन 75 किमी प्रतितास वेगाने धावत असताना एका थांबलेल्या मालगाडीला धडकली. ड्रायव्हरने वेग कमी करण्यास सुरुवात केल्यावर ट्रेन लूप लाइनमध्ये घुसली आणि मालगाडीला धडकली. ट्रेन लूप लाईनमध्ये घुसल्यानंतर कोच रेल्वे रुळावरून घसरेल. (हेही वाचा -Mysuru-Darbhanga 12578 Express Accident: तामिळनाडूमध्ये मोठा रेल्वे अपघात; म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेसची मालगाडीला धडक, डबे रुळावरून घसरले (Watch Video))

दक्षिण रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, कावराईपेट्टई स्थानकात प्रवेश करताना दिलेल्या सिग्नलनुसार मुख्य मार्गावर जाण्याऐवजी, ट्रेन 75 किमी प्रतितास वेगाने लूप/लाइनमध्ये घुसली आणि ती मालगाडीला जाऊन धडकली. या अपघातात पायलट आणि लोको पायलटला कोणतीही दुखापत झाली नाही. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, असे दक्षिण रेल्वेचे महाव्यवस्थापक आर.एन. सिंग यांनी सांगितले.

दरम्यान, रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी सांगितले की, संपूर्ण ट्रेनमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कोणालाहीही गंभीर दुखापत झाली नाही. सर्व प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी रेल्वेकडून विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. संपूर्ण प्रवासादरम्यान प्रवासी सुरक्षित असतील आणि त्यांची योग्य व्यवस्था केली जाईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement