Hindenburg Research New Report: हिंडेनबर्ग रिसर्च, लवकरच येत आहे नवा अहवाल! जगभरातील उद्योग समुहांच्या पोटात गोळा

हिंडेनबर्ग रिसर्च संस्था आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने नुकतीच माहिती दिली आहे की, ते आता लवकरच आणखी एक नवा अहवाल प्रसिद्ध करत आहेत. हिंडेनबर्ग संस्थेच्या या माहितीमुळे भारतासह जगभरातील उद्योजक, राजकारणी आणि उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे. हिंडेनबर्ग आता कोणावर निशाणा साधणार याबाबत उत्सुकता आहे.

Hindenburg Research New Report: हिंडेनबर्ग रिसर्च, लवकरच येत आहे नवा अहवाल! जगभरातील उद्योग समुहांच्या पोटात गोळा
Hindenburg Research | ( File Edited Image Used For

हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research), पाठिमागील काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy), भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market) आणि भारतीय उद्योगविश्वासह भारतीय राजकीय पटलावर आग्रक्रमाणे घेतले जाणारे नाव. याच नावाने गौतम अदानी (Gautam Adan) यांच्यासोबतच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणीत एनडीए सरकारला मोठा झटका दिला. हिच हिंडेनबर्ग रिसर्च संस्था आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने नुकतीच माहिती दिली आहे की, ते आता लवकरच आणखी एक नवा अहवाल प्रसिद्ध करत आहेत. हिंडेनबर्ग संस्थेच्या या माहितीमुळे भारतासह जगभरातील उद्योजक, राजकारणी आणि उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे. हिंडेनबर्ग आता कोणावर निशाणा साधणार याबाबत उत्सुकता आहे.

हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेचा अहवाल आला आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला जोरदार झटका बसला. भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. परिणामी गौतम अदानी यांची सप्टेंबर 2022 मध्ये असलेली 150 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती अवघ्या 53 अब्ज डॉलर्सवर येऊन थांबली. इतकेच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत व्यरक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावरअसलेले अदानी थेट 35 व्या क्रमांकावर ढकलले गेले. ही घसरण अद्यापही सुरुच आहे. हिडेनबर्गने हे संशोधन 24 जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते. हा इतिसाह असताना हिंडेनबर्गने माहिती दिली आहे की, लवकरच ते नवा अहवाली प्रसिद्ध करत आहेत. हिडेंनबर्ग यांनी केलेल्या घोषणेमुळे भारतासह जगभरातील अनेक उद्योगजक आणि उद्योग समूहांच्या पोटात भीताचा गोळा आहे. हिंडेनबर्ग आता कोणावर निशाणा साधणार याबाबतही उत्सुकता आहे. (हेही वाचा, Smriti Irani On George Soros: अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वक्तव्य, स्मृती इराणी यांच्याकडून भारतीयांना अवाहन)

गौतम अदानी यांना लक्ष्य केल्यानंतर हिंडेनबर्ग रिसर्चने 23 मार्च रोजी ट्विट करत माहिती देताना म्हटले आहे की, लवकरच ते आणखी एक नवा अहवाल प्रसिद्ध करत आहेत. आता कोणता उद्योग समूह हिंडेनबर्गच्या निशाण्यावर असणार याबाबत जगभरात उत्सुकता आहे.

ट्विट

हिंडेनबर्ग रिसर्च

हिंडनबर्ग रिसर्च ही एक गुंतवणूक संशोधन संस्था आहे. जिने सार्वजनिकरित्या व्यापार केलेल्या कंपन्यांवर गंभीर अहवाल प्रकाशित केले. ज्यातून या संस्थेने जोरदार प्रसिद्धी मिळवली. या फर्मची स्थापना 2017 मध्ये झाली. तेव्हापासून आरोग्यसेवा, तंत्रज्ञान आणि वित्त यांसह विविध उद्योगांमधील कंपन्यांद्वारे फसवणूक आणि गैरवर्तन केल्याचा आरोप असलेले अहवाल प्रकाशित केले आहेत. हिंडनबर्ग रिसर्च ज्या कंपन्यांचा अहवाल देतो त्या कंपन्यांवर शॉर्ट पोझिशन्स घेण्यासाठी ओळखले जाते. याचा अर्थ कंपनीच्या स्टॉकची किंमत कमी झाल्यास नफा होतो. फर्म निकोला कॉर्पोरेशन आणि क्लोव्हर हेल्थ इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या अहवालांसह अनेक उच्च-प्रोफाइल प्रकरणांमध्ये सहभागी आहे. हिंडेनबर्गच्या अहवालांव त्यांच्या अचूकतेवर आणि हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काही लोकांकडून टीकेचा सामना करावा लागला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)



Share Us