लज्जास्पद! गवत चरणाऱ्या गरोदर गायीच्या तोंडात फटाके फोडले, हिमाचल प्रदेश मधील धक्कादायक घटना

हे फटाके तिच्या तोंडात जाऊन फुटल्याने गाय गंभीर जखमी झाली आहे.

Cow (Photo Credits: (Pixabay) Representational Image Only

अलीकडेच केरळ (Kerala) मध्ये एका गर्भवत्री हत्तीणीला फटाके भरून अननस खाऊ घातल्याने तिचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचा तपास अजून पूर्णही झाला नसताना अशाच स्तरावरील एक घटना हिमाचल प्रदेश मधून सुद्धा समोर येत आहे. हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) मध्ये बिलासपूर (Bilaspur) जिल्ह्यातील ढांडुता (Dhanduta) या भागात एका शेतात एक गर्भवती गाय चरत असताना काही विकृतांनी तिच्या गवतात फटाके मिसळून खाऊ घातले. हे फटाके तिच्या तोंडात जाऊन फुटल्याने गाय गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर गायीच्या मालकाने शेकऱ्यांवर संशय व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे. Pregnant Elephant Dies Update: पलक्कड मध्ये गर्भवती हत्तीणीच्या मृत्यू प्रकरणी एकाला अटक, वनमंत्री के राजू यांनी दिली माहिती

प्राप्त माहितीनुसार, दहा दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचे इंडिया टुडे ने म्हटले आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात जखमी गायीच्या व्हिडिओमध्ये जबड्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले आहे. गाय इतकी जखमी झाली आहे की कदाचित दोन दिवस ते खाऊ शकणार नाही. व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्यांनी गायीचे मालक गुरदियाल सिंग यांना गायीवर उपचारासाठी मदत मागितली आहे.

दरम्यान, गुरुदयाल सिंह यांनी पोलिसांच्या तपासात सांगितल्याप्रमाणे त्यांचे आणि त्यांचे शेजारी नंदलाल यांचे वैर होते. या वादातूनच त्यांनी गायीवर असा राग काढला असणार कारण हा एकूण प्रकार घडल्यानांतर नंदलाल काही दिवसांपासून गायब आहे. या घटनेचा पूर्ण तपास अद्याप झालेला नाही मात्र ज्या देशात गायीला देवाचे स्वरूप मानले जाते तिथे हे प्रकार घडणे नक्कीच लज्जास्पद आहे अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.